क्रिकेटमविश्वातील कट्टरविरोधी म्हणून भारत आणि पाकिस्तान संघांकडे पाहिले जाते. उभय संघांमध्ये सर्व सामने हे अटीतटीचे तसेच अत्यंत स्पर्धात्मक वातावरणात झालेले पाहायला मिळतात. विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत दोन्ही देशांचे क्रिकेटप्रेमी देखील या सामन्यासाठी खूप जोशात आलेले असलेले दिसून येतात. युएई येथे होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी सर्व देशातील चाहते तयार झाले असून, भारत आणि पाकिस्तान या सामन्यासाठी मैदानाबाहेर वातावरणनिर्मिती सुरू आहे. सामना सुरू होण्यास काही तासांचा अवधी शिल्लक असताना पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने या स्पर्धेसाठी येण्यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेतल्याचे सांगितले.
काय बोलले इम्रान खान
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्यात उतरण्यापूर्वी पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम पत्रकारांना सामोरा गेला. त्याने यावेळी उद्याच्या सामन्यासाठीच्या संभाव्य संघाची घोषणा देखील केली. त्याचवेळी त्याने या विश्वचषकासाठी येण्यापूर्वी आपण पाकिस्तानचे पंतप्रधान व विश्वविजेते कर्णधार इम्रान खान यांची भेट घेतल्याचे सांगितले. एका प्रश्नाचे उत्तर देताना तो म्हणाला,
“विश्वचषकासाठी येण्यापुर्वी मी त्यांना भेटलो होतो. त्यांनी मला खास असा काही कानमंत्र दिला नाही. केवळ आपल्या खेळाच्या दिवसातील अनुभव मला सांगितले.”
टी२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तानचे संघ ५ वेळा आमनेसामने आले असून, भारताने या सर्व सामन्यात विजय मिळवला आहे. दुबई येथील या सामन्यात विजय मिळवून ही पराभवाची मालिका खंडित करण्याचे आव्हान पाकिस्तान संघापुढे आहे. हा सामना २४ ऑक्टोबर रोजी दुबईमध्ये खेळला जाईल. दुसरीकडे, सध्या भारतीय संघातील सर्व खेळाडू उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून, ते देखील आपला विजयरथ कायम राखू इच्छितात.
भारताविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ-
बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर जमान, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ, हैदर अली.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकात भारताने पाकिस्तानला नेहमीच केलयं चितपट; वाचा सर्व विजयांची कहाणी