---Advertisement---

तिकडे पाकिस्तान हारत होता, इकडे आझम फक्त रडायचा बाकी होता! ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

On: सोमवार, ऑगस्ट 29, 2022 10:21 AM
Babar-Azam-Sad-Video
---Advertisement---

भारत आणि पाकिस्तान, या संघातील सामना हा केवळ सामना नसून ती एक भावना आहे, असे म्हटले जाते. कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या या संघांचा सामना पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेटचाहते उत्सुक असतात. भारत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांबरोबरच क्रिकेटपटूही या सामन्याकडे भावनिक दृष्टीकोनातून पाहतात.

रविवारी (28 ऑगस्ट) भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघात दुबईच्या मैदानावर आशिया चषक 2022 मधील (Asia Cup 2022) दुसरा सामना खेळला गेला. या बहुप्रतिक्षित सामन्यात भारताने 5 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात पाकिस्तान संघाची अवस्था पाहून कर्णधार बाबर आझम याला अश्रू अनावर (Babar Azam Emotional) झाले होते. त्याचा ड्रेसिंग रूममधील भावूक झालेला व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पाकिस्तानचे खेळाडू प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरले होते. पाकिस्तानकडून त्यांची ठरलेली सलामी जोडी, यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान आणि कर्णधार आझम (Babar Azam) सलामीला फलंदाजीसाठी आला होता.

मात्र संघाच्या केवळ 15 धावा जमवल्यानंतर 2.4 षटकात आझम भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर अर्शदीप सिंगच्या हाती चेंडू देऊन झेलबाद झाला. भुवनेश्वरने त्याला वैयक्तिक 10 धावांवर बाद केले. आझमची विकेट गेल्यामुळे पाकिस्तानची फलंदाजी फळी कमकुवत पडली. पुढे रिझवानने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु तोदेखील 43 धावांवर बाद झाला आणि पाकिस्तानचा संघ 19.5 षटकात 147 धावांवरच गुंडाळला गेला.

https://www.instagram.com/reel/Ch1Hchiv_8k/?utm_source=ig_web_copy_link

आपण स्वस्तात बाद झाल्यामुळे आझमचे तोंड पडले होते. ड्रेसिंग रूममध्ये परतल्यावर आझम चेहरा पाडून बसला होता. तो एकटक मैदानाकडे पाहात होता. यावेळी त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. हाच प्रसंग कॅमेरात कैद झाला असून या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही पाकिस्तानी चाहत्यांना आझमची अशी स्थिती बघवली नाही. त्यांनी या व्हिडिओखाली वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-

हार्ड हिटिंग पंड्या! धोनी स्टाईल मॅच फिनिश करणाऱ्या हार्दिकला कार्तिकचा खाली झुकून ‘मुजरा’
‘ती मॅच नाही, पंतला बघायला आलेली!’ उर्वशीने भारत-पाक सामन्यात हजेरी लावल्यानंतर सोशल मीडियावर धुमाकूळ
टीम इंडियाच्या धमाकेदार विजयानंतर शरद पवारांचेही सेलिब्रेशन! पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---