पाकिस्तानचा (Pakistan) फलंदाज बाबर आझमने (Babar Azam) पुन्हा एकदा भारतीय (India) संघाचा कर्णधार विराट कोहलीशी (Virat Kohli) तुलना करु नका असे म्हटले आहे. पण कोहली आज ज्या ठिकाणी आहे तेथे जाण्याची इच्छा असल्याचेही बाबर आझमने म्हटले आहे.
“त्याने (कोहली) यापूर्वी बरेच काही साध्य केले आहे. तो त्यांच्या देशात एक महान व्यक्ती आहे. खरं सांगायचं झालं तर माझी सध्या त्याच्याशी तुलना नको. पण शेवटी मलाही ते आज मिळवायचे आहे, जे कोहलीने केले आहे,” असे पीटीआयशी बोलताना बाबर म्हणाला.
“माझी आणि विराट कोहलीची मीडिया आणि लोकांनी तुलना केली आहे. परंतु, मला जाणवले आहे की अव्वल खेळाडूंमध्ये स्थान मिळविण्यासाठी मला कसोटी क्रिकेटमध्ये अजून धावा करण्याची आवश्यकता आहे,” असे बाबर म्हणाला.
“यामुळेच अलीकडच्या काही महिन्यांत मी कसोटी (Test Cricket) सामन्यांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहे,” असेही बाबर म्हणाला.
“जर कोणी माझी तुलना कोहली किंवा स्टीव्ह स्मिथशी (Steve Smith) केली तर मी दडपणाखाली येत नाही. मी माझ्या फलंदाजीकडे लक्ष देतो आणि तास न तास फलंदाजीचे व्हिडिओ पाहतो. वास्तविकपणे मी माझ्या क्षमता ओळखतोय”, असे विराटशी तुलना करण्याबाबत बाबर म्हणाला.
बाबर सध्या पाकिस्तानच्या टी20 संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळत आहे.
कोहलीप्रमाणे बाबरसुद्धा पहिल्यांदा 19 वर्षाखालील क्रिकेटमध्ये चमकला होता. यादरम्यान पाकिस्तानने 2012 मध्ये ज्युनियर विश्वचषकात उपांत्य फेरी गाठली होती. बाबरने मात्र वेळ घेत तीन वर्षानंतर राष्ट्रीय संघात स्थान मिळवले.
24 कसोटी सामन्यात बाबरने 1547 धावा केल्या आहेत. तसेच, 36 टी20 सामन्यात त्याने 50.2 च्या सरासरीने 1405 धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाला मोठा झटका, हा वेगवान गोलंदाज झाला जखमी
वाचा- 👉https://t.co/iEMzo1OOVW👈#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi
@MarathiRT #INDvsAUS— Maha Sports (@Maha_Sports) December 17, 2019
आयपीएलमध्ये पहा कोणत्या संघाकडे किता जागा रिक्त
वाचा- 👉https://t.co/NuYcRSwCWu👈#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi
@MarathiRT #IPLAuction2020— Maha Sports (@Maha_Sports) December 17, 2019