---Advertisement---

ब्रायन लाराच्या मते विराट कोहली आहे क्रिकेटचा रोनाल्डो

On: बुधवार, डिसेंबर 18, 2019 11:52 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे जगभरात नाव कमावले आहे. युवा क्रिकेटपटू त्याचे अनुसरण करत असतात.

तंदुरुस्तीला महत्त्व देणार्‍या विराटला महान फुटबॉल क्रिस्तियानो रोनाल्डोप्रमाणे (Cristiano Ronaldo) आपल्या खेळाची आवड आहे, असे विंडीज (Windies) संघाचे माजी कर्णधार ब्रायन लारा (Brian Lara) यांचे म्हणणे आहे.

लाराच्या मते, खेळाच्या बाबतीत विराट अगदी रोनाल्डोसारखा आहे.

“कोहलीची क्रिकेटची तयारी आणि आवड कमालीची आहे. मला वाटत नाही की केएल राहुल (KL Rahul) किंवा रोहित शर्मापेक्षाही (Rohit Sharma) तो अधिक प्रतिभाशाली आहे. परंतु, स्वत: ला तयार करण्याची त्याची मेहनत त्याला वेगळे बनवते. तो क्रिकेटचा क्रिस्तियानो रोनाल्डो आहे,” असे पीटीआयशी बोलताना लारा म्हणाले.

ते पुढे म्हणाले की कोहलीची तंदुरुस्तीची पातळी खूपच उंच आहे. त्याची मानसिक दृढ़ता अविश्वसनीय आहे. क्लाईव्ह लॉईडचा (Clive Lloyd) सत्तरचा नाबाद संघ असो किंवा सर डॉन ब्रॅडमनचा (Don Bradman) 1948चा विश्वविजेता संघ असो, कोहली कोणत्याही कालखंडातील सर्वोत्कृष्ट संघात स्थान मिळवू शकेल.

कसोटी क्रिकेटमध्ये जवळपास 12000 धावा करणारा लारा म्हणाले, “त्याचे फलंदाजीचे तंत्र वेगळे आहे. त्याला कोणत्याही संघातून वगळता येणार नाही. खेळाच्या सर्व स्वरूपांमध्ये, ज्यांची सरासरी 50 च्या वर आहे, हे आश्चर्यकारक आहे. विश्वास ठेवण्यासारखे नाही,” असेही लारा म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---