---Advertisement---

…म्हणून ताब्राईज शम्सीने विकेट घेतल्यानंतरचा हा व्हिडियो होतोय व्हायरल

On: बुधवार, डिसेंबर 18, 2019 12:40 PM
---Advertisement---

मैदानावर जादू करणारा दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज ताब्राईज शम्सीने पुन्हा एकदा विकेट घेतल्यानंतर केलेल्या अनोख्या सेलिब्रेशनमुळे चर्चेत आला आहे. यावेळी विकेट घेऊन जल्लोष करणाऱ्या शम्सीने बूट काढून कानाला फोन लावल्याप्रमाणे कृती करत आंनद साजरा केला.

घडले असे की मझांसी सुपर लीगमध्ये अंतिम सामन्यात पार्ले रॉक्सकडून खेळणाऱ्या तबरेझने आठव्या षटकात श्वेन स्पार्टन्सचा सलामीवीर डीन एल्गारला 22 धावांवर बाद करून आपल्या संघाला दुसरी विकेट मिळवून दिली. त्यानंतर शम्सीने 13 व्या षटकात श्वेन स्पार्टन्सचा कर्णधार हेन्रिक क्लॅसनची महत्त्वपूर्ण विकेट घेतली. 

क्लॅसनची विकेट घेतल्यानंतर शम्सीने आनंद व्यक्त करताना बूट काढून तो मोबाईल फोनप्रमाणे कानाला लावला. हा व्हिडिओ मझांसी सुपर लीगच्या अधिकृत ट्विटर हँडेलवर शेअर करण्यात आला आहे. 

https://twitter.com/MSL_T20/status/1206612377522843648?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1206612377522843648&ref_url=https%3A%2F%2Fwww.amarujala.com%2Fcricket%2Fcricket-news%2Ftabraiz-shamsi-paarl-rocks-beat-tshwane-spartans-in-mzansi-super-league-2019-final

बोलँड पार्क येथे खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात पार्ले रॉक्सने श्वेन स्पार्टन्सचा पराभव केला आणि या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. या सामन्यात श्वेन स्पार्टन्सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 147 धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून एबी डिविलियर्सने 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. 

त्यानंतर फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पार्ले रॉक्सने केवळ 14.2 षटकांत 148 धावांचे लक्ष्य गाठले. पार्ले रॉक्सचा सलामीवीर हेन्री डेव्हिड्सने नाबाद 77 धावांची अर्धशतकी खेळी केली आणि ड्वेन प्रेटोरियसने 43 धावांची शानदार खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला.

https://twitter.com/Maha_Sports/status/1206952043967139841

https://twitter.com/Maha_Sports/status/1206885442726940677

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---