पाकिस्तानचा सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक असणारा बाबर आझम आता आपल्या देशाचा मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचाही कर्णधार बनला आहे. पीसीबीने त्याला वनडे आणि टी२० संघाचे कर्णधारपद सोपविले आहे. तो कर्णधार बनताच पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी बाबरवर निशाना साधण्यास सुरुवात केली आहे.
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू तन्वीर अहमदने (Tanveer Ahmed) बाबरला इंग्रजी भाषा (English Language) शिकण्याचा सल्ला दिला आहे. त्यावर बाबरने (Babar Azam) आता प्रत्युत्तर दिले आहे.
बाबरने दिले उत्तर-
बाबर म्हणाला की, “माझं काम पाकिस्तानसाठी क्रिकेट खेळणे आहे. मी कोणताही इंग्रज नाही, जो पटापट इंग्रजी बोलेल. होय मी यावर काम करत आहे, काही काळानंतर बोलेल.”
संपूर्ण क्रिकेट जगतात बाबरच नव्हे तर असे अनेक क्रिकेटपटू आहेत ज्यांना इंग्रजी चांगल्याप्रकारे बोलता येते. परंतु याचा अर्थ असा नाही की लोकांनी त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले पाहिजे. भारतीय संघात सुरुवातीला रविंद्र जडेजा, हरभजन सिंगसारखे खेळाडू होते. त्यांना पूर्वी इंग्रजी बोलता येत नव्हते. परंतु त्यांनी इंग्रजी भाषेवर काम केले आणि आता ते इतरांप्रमाणे इंग्रजी बोलतात.
पाकिस्तान संघाचा कर्णधार झाल्यानंतर म्हटले की, “पाकिस्तानचा वनडे आणि टी२० संघाचा कर्णधार होणे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. मी मिस्बाह उल हक आणि इतर अनुभवी खेलाडूंचा सल्ला-मसलत करत असतो. पाकिस्तान संघाचे नेतृत्व करणे सोपे नाही. परंतु मी माझे चांगले देण्याचा प्रयत्न करेल. जेणेकरून संघ अधिकाधिक सामने जिंकेल.”
तो पुढे म्हणाला की, “तो इम्रान खानप्रमाणे आक्रमक नेतृत्व करणे आवडेल. तसेच इंग्लंडमध्ये जाऊन खेळणे कठीण नक्कीच आहे. परंतु जर योग्य सुरक्षा आणि व्यवस्था असेल तर मालिका खेळली जाऊ शकते. तसेच मला टी२० विश्वचषक खेळायला आवडेल.”
विराट कोहलीशी तुलना करू नका- बाबर आझम
बाबरने चाहत्यांना विनंती करत म्हटले की, “भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीशी (Virat Kohli) माझी तुलना करू नका. तो एका वेगळ्याच स्तरावरील खेळाडू आहे. मी माझ्या हिशोबाने चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-बेन स्टोक्स म्हणतो, पराभवानंतर विराटने केली ही घाणेरडी गोष्ट
-एकाच वनडेत ओपनिंग गोलंदाजी व ओपनिंग फलंदाजी करणारे ५ भारतीय
-भारतीय वंशाचे ‘हे’ पाच खेळाडू, ज्यांनी परदेशी संघांचे केले नेतृत्व