भारतात यावर्षीचा विश्वचषक खेळला जाणार असून या स्पर्धेचा पहिला सामना 5 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. वनडे विस्वचषकाची सुरुवात होण्याआधी शुक्रवारी (29 सप्टेंबर) स्पर्धेचे सराव सामने सुरू झाला. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यायंच्यातील सराव सामना हैदराबादमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याचा फॉर्म पाहून विरोधकांना घाम फुटू शकतो.
बाबर आझम (Babar Azam) भारतात शुक्रवारी (29 सप्टेंबर) कारकिर्दीतील पहिलाच सामना खेळला. हा सामना विश्वचषक 2023 पूर्वीचा सराव सामना असून विरोधात न्यूझीलंडसारखा बलाढ्य संघ होता. कर्णधार बाबरने या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानचे सलामीवीर फलंदाज अबुद्ला शफिक आणि इमाम उल हक कर्णधाराच्या या निर्णयाला साजेशे प्रदर्शन करू शकले नाहीते. दोघांनी अनुक्रमे 14 आणि 1 धाव करून विकेट्स गमावल्या. पण तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला बाबर आझम चांगल्या फॉर्ममध्ये होता.
भारतात आपल्या कारकिर्दीतील पहिलाच सामना खेळण्याची संधी बाबरला मिळाली. न्यूझीलंडविरुद्धच्या या सराव सामन्यात त्याने 84 चेंडूत 80 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. मोहम्मद रिझवान याच्यासोबत तिसऱ्या विकेटसाठी बाबरने शतकी भागीदारी देखील केली. भारतात खेळल्या जाणाऱ्या वनडे विश्वचषकापूर्वी बाबरचा हा फॉर्म विरोधी संघांसाठी चिंतेची बाब ठरू शकतो. भारतात खेळण्याचा अनुभव बाबरसह पाकिस्तान संघाला नाहीये. कारण 2012-13 नंतर त्यांनी भारतात एकही सामना खेळला नाहीये. दोन्ही देशांमधील राजकिय संघर्षामुळे हे दोन शेजारी राष्ट्र फक्त विश्वचषक आणि आशिया चषकात एकत्र खेळतात. असे असले तरी, आगामी विश्वचषकात पाकिस्तान संघ विजेतेपदासाठी दावेदार मानला जात आहे. (Babar Azam scored a half-century on his debut in India)
महत्वाच्या बातम्या –
आरसीबीला ट्रॉफी जिंकवण्याची जबाबदारी ‘या’ दिग्गजावर, इंग्लंड क्रिकेटसाठी 12 वर्षांत केलंय खास काम
World Cup Countdown: फ्लाईंग कैफचा 20 वर्षापासून अबाधित असलेला विक्रम, श्रीलंकेविरुद्ध दाखवलेला जलवा