पाकिस्तानच्या संघाने नुकत्याच पार पडलेल्या झिम्बाब्वे दौऱ्यात कसोटी मालिकेत विजय मिळविला. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दोन्ही सामने जिंकत त्यांनी मालिका आपल्या खिशात घातली. यातील दुसरा सामना पाकिस्तानने एक डाव आणि १४७ धावांनी जिंकला.
या विजयाने पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमचा आनंद द्विगुणित झाला. कारण दुसर्या कसोटीतील विजयासह एक खास विक्रम बाबर आझमच्या नावे नोंदवला गेला. जो विक्रम आजवर पाकिस्तानच्या एकाही कसोटी कर्णधाराला जमला नव्हता.
बाबर आझमचा धडाकेबाज विक्रम
पाकिस्तानने यजमान झिम्बाब्वेला दुसर्या कसोटीत पराभूत केले. हा विजय कर्णधार म्हणून बाबर आझमने धुरा सांभाळल्या पासून पाकिस्तानचा सलग चौथा विजय ठरला. कर्णधार म्हणून पहिल्या चार कसोटी सामन्यात विजय मिळवण्याचा पराक्रम बाबरने केला. असा कारनामा करणारा तो पाकिस्तानच्या इतिहासातील पहिलाच कर्णधार ठरला.
बाबर आझमने सर्वप्रथम कर्णधारपद सांभाळले ते दक्षिण आफ्रिके विरूद्ध. ही मालिका पाकिस्तानमध्ये खेळवण्यात आली होती. या मालिकेत देखील पाकिस्तानने पहिल्या दोन्ही सामन्यात विजय प्राप्त केला होता आणि मालिका जिंकली होती. हे विजय बाबर आझमच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीतील पहिले दोन विजय ठरले. तर झिम्बाब्वे विरूद्ध पुढील दोन विजय मिळवत त्याने इतिहास रचला.
बाबर ठरला एप्रिल महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटू
बाबर आझमसाठी दुहेरी आनंदाची गोष्ट म्हणजे आजच आयसीसीने एप्रिल महिन्याच्या ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्काराची घोषणा केली. हा पुरस्कार पुरुष क्रिकेटपटूंच्या विभागात बाबर आझमला जाहीर झाला. बाबरने या पुरस्काराच्या शर्यतीत बाजी मारतांना पाकिस्तानच्याच फखर झमान आणि नेपाळच्या कुशल भुर्तेल यांना मागे टाकले. एप्रिल महिन्यात केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीचे फळ त्याला मिळाले. बाबरने दक्षिण आफ्रिके विरूद्ध मायदेशात झालेल्या वनडे मालिकेत दमदार कामगिरी केली होती. त्याच जोरावर त्याने वनडे क्रमवारीत भारतीय कर्णधार विराट कोहलीला मागे टाकत अव्वल स्थान देखील गाठले होते. याचबरोबर त्याने टी२० सामन्यात देखील खोर्याने धावा काढल्या होत्या. यामुळेच त्याला आयसीसीने हा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
विराटच्या एका मेसेजची कमाल अन् हर्षल पटेल बनला आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज
भारताच्या श्रीलंका दौर्याला १३ जुलै रोजी होणार सुरवात, ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक
‘तो’ खेळाडू इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळवू शकत होता, राहुल द्रविडने व्यक्त केले मत