---Advertisement---

वेस्ट इंडिजविरुद्ध दिसला बाबरच्या मनाचा मोठेपणा; अशी दाखवली खिलाडूवृत्ती

---Advertisement---

संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) सातव्या टी२० विश्वचषकातील सराव सामन्यांना सोमवारी (१८ ऑक्टोबर) सुरुवात झाली. पहिल्या सराव सामन्यात गतविजेत्या वेस्ट इंडीजला पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. पाकिस्तानच्या फटकेबाजांनी हा सामना एकतर्फी करत ७ गडी राखून विजय मिळवला. मात्र, या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने दाखवलेल्या खेळाडूवृत्तीचे सर्वजण कौतुक करत आहे.

बाबरची खिलाडूवृत्ती
या सराव सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने वेस्ट इंडीजच्या डावादरम्यान दाखवलेल्या खिलाडूवृत्तीने सर्वांची मने जिंकली. वेस्ट इंडीजचा आक्रमक फलंदाज शिमरन हेटमायर डावाच्या १५ व्या षटकात झेलबाद झाल्याचा हा निर्णय पंचांनी दिला होता. चेंडू आणि त्याची बॅट यांच्यात कोणताही संपर्क नसल्यामुळे पंचाच्या निर्णयावर हेटमायर अत्यंत नाखूष दिसत होता. हेटमायर निराश मनाने पॅव्हेलियनमध्ये परतत असताना त्याला पाकिस्तानी कर्णधार आझमने थांबविले.
आझमने हेटमायरला पुन्हा फलंदाजीची संधी दिली. चेंडू हेटमायरच्या बॅटला लागला नसल्याने बाबरचा निर्णय योग्य होता. चेंडू बॅट जवळून जाताना जो आवाज आला तो त्याच्या गळ्यातील साखळीचा होता. आझमच्या या निर्णयाने सर्वांची मने जिंकली आणि सोशल मीडियावर त्याचे खूप कौतुक झाले.

पाकिस्तानची सराव सामन्यात सरशी
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजला प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ७ बाद १३० धावा करता आल्या. कर्णधार कायरन पोलार्डने २३ व हेटमायरने २८ धावा बनविल्या. पाकिस्तानसाठी शाहिन आफ्रिदी, हारिस रौफ व हसन अली यांनी प्रत्येकी दोन बळी मिळविले. प्रत्युत्तरात, कर्णधार बाबर आझम व फखर झमान यांनी अनुक्रमे ५० व नाबाद  ४६ धावा काढून संघाला ७ गडी राखून विजय मिळवून दिला. पाकिस्तानचा स्पर्धेतील पहिला सामना २४ ऑक्टोबर रोजी भारताविरुद्ध होईल.

महत्त्वाच्या बातम्या-

टी२० विश्वचषकात आयर्लंडच्या क्रिकेटपटूने घडवला इतिहास! ४ चेंडूत घेतल्या सलग ४ विकेट्स

Video: पराभवानंतर बांगलादेशचा कर्णधार प्रेस कॉन्फरन्समध्ये आला, पण स्कॉटीश फॅन्सने घातला ‘असा’ गोंधळ,

युएईत विराटला मिळणार का ‘ती’ संधी; अकरा वर्षांपासून पाहतोय वाट

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---