---Advertisement---

तुर्तास संकट टळलं! बाबर आझमसह अन्य खेळाडूंनी केली पीसीबीच्या वार्षिक करारावर स्वाक्षरी

On: शुक्रवार, ऑगस्ट 12, 2022 1:37 PM
---Advertisement---

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी खेळाडू आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) यांच्यात वार्षिक करारावरून काही मतभेद झाले असल्याचे समोर आले होते. ज्यामुळे पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझमसह अनेक महत्वाच्या खेळाडूंनी वार्षिक करारावर असहमती दर्शवत स्वाक्षरी करण्यास नकार दिला होता. परंतू सध्या या खेळाडूंनी पीसीबीने केलेल्या काही सुधारणांनंतर केंद्रीय करारावर स्वाक्षरी केली असल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या पाकिस्तानी संघ आशिया चषकासाठी तयारी करत आहे. सप्टेंबरमध्ये या आशिया चषकाचा शेवट झाल्यानंतर करारातील काही तरतुदींवर चर्चा करून योग्य मार्ग काढता येईल या अटीवर सध्या पाकिस्तानी खेळाडूंनी करारावर स्वाक्षरी केल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने प्रसारित केलं आहे. त्यामुळे आता खेळाडूंनी ज्या गोष्टींवर आक्षेप घेतला होता त्या तरतुदींवर मार्ग निघेल अशी अपेक्षा पाकिस्तानी खेळाडू व्यक्त करत आहेत.

या करारामध्ये विशेषत: विदेशी क्रिकेट लीगमध्ये सहभागी होण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र (NOC) याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी)च्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठीच्या शुल्काबाबत अधिक विस्तारित माहिती या सारख्या हरकती पाकिस्तानी खेळाडूंनी पीसीबीकडे या कराराबाबत नोंदवल्या होत्या. मात्र, सध्यातरी काही अटीशर्तींच्या जोरावर खेळाडूंना करार मान्य करावा लागला आहे. पीसीबीने यंदाच्या वार्षिक करारात एकुण ३३ खेळाडूंचा समवेश केला होता. ज्यांपैकी थेट कर्णधार बाबर आझमसह, स्टार फलंदाज मोहम्मद रिझवान आणि स्टार गोलंदाज शाहिन आफ्रिदी यांनीच थेट या करारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने हे प्रकरण मोठ्या स्तरावर जाऊन पोहोचले होत.

दरम्यान, खेळाडूंच्या वार्षिक करारामध्ये वर्षभरात संघाच्या क्रिकेट वेळापत्रकानुसार मानधन निश्चित केलेले असते. याशिवाय क्रिकेट बोर्डाच्या काही अटी शर्ती खेळाडूंना मान्य कराव्या लागतात. त्यामुळे खेळाडू आणि संबंधित क्रिकेट बोर्ड या दोघांच्या सहमतीनंतर हा करार केला जातो.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

पाकिस्तानी खेळाडू यावर्षी भारतात क्रिकेट खेळणार? स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात होणार विशेष सामना

धवनसोबत धोका? केएल राहुल परतल्याने कॅप्टन्सीवरून हाकालपट्टी, अपमानावर भडकले चाहते

वाद चिघळला! पंतच्या कमेंटवर उर्वशी रौतेलाचे प्रत्युत्तर; म्हणाली, ‘छोटू भैया, मी बदनाम व्हायला..’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---