पाकिस्तान आणि झिम्बाब्वे संघात टी20 विश्वचषक 2022मधील 24वा सामना खेळण्यात आला. या सामन्यात झिम्बाब्वे संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. सुपर 12च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला भारताविरुद्ध शेवटच्या चेंडूवर पराभवाचा सामना करावा लागला होता दुसरीकडे, झिम्बाब्वे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाच्या दिशेने जात होता, पण पावसाने त्यांना वाचवले. अशात गुरुवारी (दि. 27 ऑक्टोबर) पर्थ येथे खेळण्यात आलेल्या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने शानदार झेल घेत सर्वांच्याच भुवया उंचावल्या. यादरम्यानचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
बाबर आझमने घेतला शानदार झेल
नेहमीच पाकिस्तान संघाच्या क्षेत्ररक्षणावर प्रश्नचिन्ह उभे राहत असतात. संघाला त्यांच्या क्षेत्ररक्षकांनी अनेकदा निराश केले आहे. मात्र, झिम्बाब्वे संघाविरुद्धच्या सामन्यात कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याने शानदार झेल घेत सर्वांची बोलती बंद केली. ही घटना डावाच्या 14व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर घडली. झिम्बाब्वेचा यष्टीरक्षक फलंदाज रेगिस चकाब्वा हा फलंदाजीला उतरला होता. चौदावे षटक टाकत असलेल्या शादाब खान याच्या शेवटच्या चेंडूवर त्याने फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या बॅटची कड घेत स्लीपच्या दिशेने गेला. तिथे क्षेत्ररक्षण करत असलेल्या बाबरपासून चेंडू तसा दूर होता. मात्र, तरीही बाबरने झेप घेत एका हाताने चेंडू पकडला. यादरम्यानचा व्हिडिओ टी20 विश्वचषकाच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आलाय.
Babar with a beauty!
We can reveal that this catch from Babar Azam is one of the moments that could be featured in your @0xFanCraze Crictos of the Game packs from Pakistan v Zimbabwe.
Grab your pack from https://t.co/EaGDgPOSBl to own iconic moments from every game. pic.twitter.com/tIUxtqRu5E
— T20 World Cup (@T20WorldCup) October 27, 2022
धाव न घेता गमावल्या 4 विकेट्स
झिम्बाब्वेने या सामन्यात चांगली सुरुवात केली होती, पण पाकिस्तानच्या गोलंदाजांनी दमदार पुनरागमन केले. 95च्या धावसंख्येवर झिम्बाब्वेने फक्त 3 विकेट्स गमावल्या होत्या. मात्र, याच धावसंख्येवर संघाने झटपट 7वी विकेटही गमावली. 14व्या षटकात शादाब खान याने सलग दोन चेंडूंवर दोन विकेट्स घेतल्या. तसेच, 15व्या षटकात मोहम्मद वसीम ज्यूनिअर यानेही सलग दोन चेंडूंवर दोन विकेट्स घेतल्या. यामध्ये खतरनाक फलंदाज सिकंदर रझा याच्याही नावाचा समावेश होता. मात्र, यापैकी एकाही गोलंदाजाला हॅट्रिक विकेट घेता आली नाही.
पाकिस्तानला 131 धावांचे आव्हान
पाकिस्तान संघाला या सामन्यात 131 धावांचे आव्हान मिळाले होते. यावेळी झिम्बाब्वेने 8 विकेट्स गमावत 130 धावा चोपल्या. सीन विलियम्स याने सर्वाधिक 31 धावांचे योगदान दिले. फलंदाज मधेवेरे आणि एर्विन यांनी पहिल्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी रचली. खालच्या फळीत ब्रॅड इव्हान्सने 19 धावा केल्या. दुसरीकडे, पाकिस्तानकडून मोहम्मद वसीमने 4, तर शादाब खान याने 3 विकेट्स घेतल्या.
विशेष म्हणजे, शानदार झेल घेणारा बाबर झिम्बाब्वेच्या आव्हानाचा पाठलाग करताना फक्त 4 धावा करून तंबूत परतला. या सामन्यात पाकिस्तानला पुन्हा एकदा अपयश आले. झिम्बाब्वेने पाकिस्तानला या सामन्यात शेवटच्या चेंडूवर 1 धावेने पराभूत केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल 2023 पूर्वी दिल्ली कॅपिटल्स ‘या’ त्रिमूर्तीला देणार नारळ? 10 कोटींच्या खेळाडूलाही मिळू शकतो डच्चू
केएल राहुलच्या खराब निर्णयावर स्पष्टच बोलला सेहवाग; म्हणाला, ‘फॉर्ममध्ये नाहीये तर…’