एका बाजूला टी20 विश्वचषकाचा थरार शिगेला पोहचला असताना, आता आयपीएल 2023 च्या तयारीला देखील सुरुवात झाली आहे. सर्व संघांना 15 नोव्हेंबरपर्यंत संघात रिटेन करावयाच्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सुुपूूर्द करणे आवश्यक आहे. त्यातचं एक बातमी अशी देखील येत आहे की, रिषभ पंत (Rishabh Pant) च्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्स शार्दूल ठाकूर समवेत तीन अन्य खेळाडूंना करारातून मुक्त करण्याची शक्यता आहे. संघांनी 15 नोव्हेंबर पर्यंत खेळांडूंची यादी दिल्यानंतर डिसेंबरच्या महिन्यात आयपीएल 2023 चा लिलाव होण्याची शक्यता आहे.
एका क्रिकेट संकेतस्थळाच्या अहवालानुसार, दिल्ली कॅपिटल्सचा संघ शार्दुल ठाकुर (Shardul Thakur) समवेत मनदीप सिंह (Mandeep Singh) आणि केएस भरत( KS Bharat) यांना करारमुक्त करू शकतो.
दिल्ली कॅपिटल्सने मागच्या लिलावात शार्दुल याला 10.75 कोटी रुपये खर्च आपल्या संघात सामील केले होते. मात्र, त्या तुलनेत त्याचे प्रदर्शन झालं नाही. त्याने आयपीएल 2022 मध्ये खेळलेल्या 14 सामन्यात 14 गडी बाद करत 120 धावा देखील केलेल्या. यादरम्यान या 31 वर्षीय खेळाडूचा इकॉनमी रेट 10 च्या जवळपास होता. तसेच 31.5 ची सरासरी होती. दिल्ली कॅपिटल्सच्या आधी शार्दुल चेन्नई सुपर किंग्स या संघाचा भाग होता आणि धोनीच्या नेतृत्वाखाली त्याच प्रदर्शन यापेक्षा अधिक चांंगले होते. अष्टपैलू प्रदर्शन करत त्याने चेन्नईच्या विजयात मोलाचे योगदान दिलेले.
दिल्ली कॅपिटल्स शार्दुलला करारमुक्त करून पुढच्या लिलावात कमी किंमतीमध्ये पुन्हा आपल्या संघात सामील करू शकतो. तसेच काही अन्य दोन खेळाडूंसोबत देखील होऊ शकतं. मनदीपला दिल्लीने 1.10 कोटीमध्ये तर, केएस भरत याच्यावर 2 कोटी रुपये खर्च केलेले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
टी20 विश्वचषकातील सर्वात भारी व्हिडिओ, अर्धशतकवीर सूर्याला सेलिब्रेशन करण्यास विराटने पाडले भाग
VIDEO: सरकारही पडलं अन् ‘तोही’ झाला शांत, बांगलादेशच्या सलामीवीरांनी गपगुमान धरली तंबूची वाट