शेजारी देश पाकिस्तानला दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंका संघाचा दौरा करायचा आहे. श्रीलंका दौऱ्यावर, पाक संघ १६ जुलै ते २० जुलै दरम्यान गाले येथे पहिला सामना खेळेल आणि दुसरा सामना २४ जुलै ते २८ जुलै दरम्यान आर प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळेल. कसोटी मालिकेपूर्वी संघाचा कर्णधार बाबर आझम याने आज पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची समर्थपणे उत्तरे दिली.
पाकिस्तानच्या कर्णधाराने नुकताच भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा एक मोठा विक्रम केला आहे. खरं तर, विराट कोहली १०१३ दिवस टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नंबर वन फलंदाज होता. मात्र दीर्घकाळापासून टी२० क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या बाबरने विराटचा हा मोठा विक्रम मोडीत काढला आहे. याबाबत पाकिस्तानच्या कर्णधाराला विचारले असता, त्याने अतिशय मजेशीर उत्तर दिले.
Babar Azam’s EPIC Reply to ‘You Broke Another Virat Kohli Record’ Goes VIRAL #BabarAzam pic.twitter.com/Zl6tPTnJwM
— Vikash Gaur 🇮🇳 (@thevikashgaur) July 5, 2022
पत्रकाराने बाबरला प्रश्न विचारला आणि म्हणाला की, मला तुम्हाला दोन प्रश्न विचारायचे आहेत. माझा पहिला प्रश्न आहे की, तुम्ही अलीकडेच विराट कोहलीचा एक मोठा विक्रम मोडला आहे. पत्रकाराचा सगळा प्रश्न संपण्यापूर्वीच बाबर आझम यांनी विचारले कोणते? यावर पत्रकाराने उत्तर दिले की, “तुम्ही सर्वात जास्त काळ टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नंबर वन आहात.”
पत्रकाराच्या या प्रश्नाला उत्तर देताना बाबर म्हणाला की, “मला देवाचे आभार मानायचे आहेत. यात माझ्या मेहनतीचाही समावेश आहे आणि त्यामुळेच मी चांगली कामगिरी करू शकलो आहे.” याशिवाय आगामी दौऱ्याबाबत बोलताना पाकिस्तानचा कर्णधार म्हणाला की, “तिथली परिस्थिती वेगळी आणि कठीण असेल, पण आम्ही आव्हानाचा सामना करण्यासही तयार आहोत. तेथील परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही फिरकी खेळपट्ट्यांवर विशेष सराव केला आहे. याशिवाय रावळपिंडीतही आम्ही अशाच विकेट्सवर सराव सामने खेळले आहेत.”
दरम्यान, बाबर आझामने गेल्या काही कालावधीत विराटने स्थापित केलेले अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. सध्या बाबर आयसीसीच्या क्रमवारीत शिखरावर जाऊन बसला आहे. तर दुसरीकडे विराट सध्या वाईट फॉर्मसोबत झुंज देत आहे. मात्र, अनेक दिग्गजांकडून दोघांबद्दल विविध मते वर्तवली जात आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कॅप्टन बुमराहने रचला इतिहास, पाकिस्तानच्या दिग्गजाचा विक्रम मोडत सेना देशांत केली ‘ही’ कामगिरी
भारतासाठी ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ खबर, लक्ष्मणची संघाचा प्रशिक्षक म्हणून निवड
‘भारताने सामन्यात चमकदार कामगिरी केली’ माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींनी केली संघाची पाठराखण