क्रिकेटटॉप बातम्या

बुमराहसारखा दुसरा कोणीच नाही! मेलबर्न कसोटीत केले हे 5 मोठे रेकॉर्ड

मेलबर्न येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना अतिशय रोमांचक वळणावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियनं दुसऱ्या डावात 9 विकेट गमावून 228 धावा केल्या असून त्यांची एकूण आघाडी 333 धावांची झाली आहे. एकेकाळी ऑस्ट्रेलियानं 91 धावांत 6 विकेट गमावल्या होत्या. त्यादरम्यान जसप्रीत बुमराहनं भारतासाठी शानदार गोलंदाजी केली. दुसऱ्या डावात त्यानं आतापर्यंत एकूण 4 बळी घेतले आहेत. यासोबतच बुमराहनं अनेक मोठे विक्रमही केले. या बातमीत आम्ही तुम्हाला अशा 5 मोठ्या विक्रमांबद्दल सांगणार आहोत, जे जसप्रीत बुमराहनं मेलबर्न कसोटी सामन्यात आपल्या नावे केले.

(5) कसोटीत किमान 200 बळी आणि 20 पेक्षा कमी सरासरी असलेला एकमेव गोलंदाज – जसप्रीत बुमराह आता कसोटी क्रिकेटमध्ये किमान 200 बळी घेणारा आणि 20 पेक्षा कमी सरासरी असलेला कसोटी इतिहासातील एकमेव गोलंदाज बनला आहे. कसोटीत त्याची सरासरी 19.41 असून त्याच्या विकेट्सची संख्या 201 वर पोहोचली आहे.

(2) चेंडूंच्या बाबतीत सर्वात जलद 200 कसोटी विकेट घेणारा भारतीय – जसप्रीत बुमराहनं 8484व्या चेंडूवर 200 कसोटी बळी पूर्ण केले. अशाप्रकारे तो सर्वात कमी चेंडू टाकून सर्वात जलद 200 बळी घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर मोहम्मद शमी आहे, ज्यानं 9896 चेंडू टाकून 200 बळी पूर्ण केले.

(3) ऑस्ट्रेलियात एका मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज – या मालिकेत जसप्रीत बुमराहनं भारतीय संघाकडून आतापर्यंत 29 विकेट घेतल्या आहेत. अशाप्रकारे, तो ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. मालिकेचा अखेरचा कसोटी सामना अजून खेळणं बाकी आहे.

(2) सेना देशांमध्ये भारतासाठी सर्वाधिक कसोटी बळी – जसप्रीत बुमराहनं 2018 मध्ये कसोटी पदार्पण केल्यापासून आतापर्यंत 202 विकेट घेतल्या आहेत. यापैकी त्यानं सेना देशांमध्ये (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) 150 बळी घेतले आहेत. या देशांमध्ये कोणत्याही भारतीय गोलंदाजाचा हा सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम आहे. अनिल कुंबळेनं या देशांमध्ये 141 विकेट घेतल्या होत्या, ज्याचा रेकॉर्ड बुमराहनं मोडला आहे.

(1) मेलबर्नमध्ये भारतीय गोलंदाजाद्वारे सर्वाधिक विकेट्स – जसप्रीत बुमराहनं मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर आतापर्यंत 3 सामन्यात 23 विकेट घेतल्या आहेत. यासह त्यानं आता मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर कोणत्याही भारतीय गोलंदाजानं सर्वाधिक कसोटी बळी घेण्याचा विक्रम केला आहे.

हेही वाचा – 

ऑस्ट्रेलियन मीडियानं केला विराट कोहलीचा घोर अपमान, ट्रोलिंगच्या सर्व मर्यादा पार
टीम इंडियासाठी 300 पेक्षा अधिक धावांचं लक्ष्य मोठं नाही, यापूर्वीही केले आहेत अनेक चमत्कार
‘मास्टरमाइंड’ कोहलीनं मिळवून दिली सिराजला विकेट, एक सल्ल्यानं सामन्याचं चित्र पालटलं!

Related Articles