---Advertisement---

बाबर आझमची नाचक्की! पाकिस्तानच्या संसदेत झाला ट्रोल, खासदारानं घेतली खूप मजा

On: सोमवार, जून 24, 2024 9:49 AM
Babar-Azam
---Advertisement---

टी20 विश्वचषकात पाकिस्तानच्या खराब कामगिरीनंतर बाबर आझम आणि त्याच्या संघावर सर्व बाजूंनी टीका होत आहे. प्रथम यजमान अमेरिकेविरुद्ध आणि नंतर कट्टर प्रतिस्पर्धी भारताविरुद्धच्या पराभवामुळे पाकिस्तानी चाहते खूप निराश झाले आहेत. आता हे प्रकरण पाकिस्तानच्या संसदेतही पोहोचलं असून, तिथे अब्दुल कादिर पटेल नावाच्या खासदारानं बाबर आझम आणि पाकिस्तान संघाला भर संसदेत ट्रोल केलं. त्यांनी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा उल्लेख करत बाबर आझमची खिल्ली उडवली.

अब्दुल कादिर पटेल म्हणाले, “पाकिस्तान संघाला असं काय झालं आहे की ते अमेरिकेकडून हरले, भारताकडूनही हरले. बाबर आझम यानं ज्येष्ठ क्रिकेटपटूकडून धडा घ्यावा आणि रॅली काढावी, कागदपत्रं ओवाळून आपल्याविरोधात षडयंत्र रचलं जात असल्याचं सांगावं. असं केल्यानं बाबर आझम हे संपूर्ण प्रकरण शांत करू शकतो.”

वास्तविक, संसदेतील अविश्वास प्रस्तावादरम्यान इम्रान खान यांनी असं केलं होतं. अब्दुल कादिर पटेल यांनी याचा येथे संदर्भ लावला आहे. पाकिस्तानच्या संसदेतील हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. तुम्ही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.

 

पाकिस्तानचा संघ 2022 टी20 विश्वचषकात फायनलपर्यंत पोहचला होता. अंतिम सामन्यात त्यांचा इंग्लंडकडून पराभव झाला. यावेळी मात्र पाकिस्तानला सुपर 8 मध्येही पोहचता आलं नाही. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाचा प्रथम अमेरिकेविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला. त्यानंतर भारताविरुद्धही संघ विजयाच्या जवळ येऊन पराभूत झाला. यामुळे पाकिस्तानला साखळी फेरीतूनच बाहेर व्हाव लागलं.

याआधी बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानला 2023 एकदिवसीय विश्वचषकातही बाद फेरी गाठता आली नव्हती. यामुळे आता त्याला कर्णधारपदावरून हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---