---Advertisement---

पाकिस्तान संघाला ८ वर्षाच्या चिमुकल्याने पत्र लिहून मागितले ऑटोग्राफ, बाबर आझमने दिले ‘असे’ उत्तर

---Advertisement---

पाकिस्तान संघ टी२० विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात पराभूत झाला आणि स्पर्धेतून बाहेर पडला आहे. कर्णधार बाबर आजमने संपूर्ण टी२० विश्वचषकादरम्यान जबरदस्त प्रदर्शन केले आणि चाहत्यांची मने जिंकली आहेत. तसेच मैदानाबाहरेची तो चाहत्यांना खूश करण्यात अनेकदा यशस्वी ठरला आहे. यावेळी त्याने पाकिस्तान संघाच्या एका ८ वर्षाच्या चाहत्याला एक खास उत्तर दिले आहे. त्यानंतर चाहते बाबरचे कौतुक करत आहेत

पाकिस्तानच्या या ८ वर्षाच्या चाहत्याचे नाव मोहम्मद हारून सुरिया असे आहे. त्याने बाबर आजम आणि संपूर्ण पाकिस्तान संघासाठी एक खास पत्र लिहिले आहे. पत्रात त्याने पाकिस्तान खेळाडूंनी विश्वचषकादरम्यान दाखवलेल्या प्रदर्शनाचे कौतुक केले आहे आणि कर्णधारासह सर्व खेळाडूंनी एका कागदावर त्यांची स्वाक्षरी द्यावी, अशी विनंती केली आहे.

या चाहत्याने पाकिस्तान संघाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “प्रिय पाकिस्तान संघ, आम्हाला तुमच्यावर अभिमान आहे. मला बाबर आजम खूप आवडतो. सर्वांनी खूप चांगले प्रदर्शन केले. सामन्यात सर्वांनी चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी केली. एक दिवस मी देखील पाकिस्तान संघासाठी फक्त खेळणार नाही, तर कर्णधार बनून संघाला चषक जिंकवून देईल. माझ्या संघात मी तुमच्या संपूर्ण संघाला बोलवेल आणि आपण एकत्र येऊन अंतिम सामन्यात पोहोचवू आणि जिंकू. तुम्ही एका कागदावर तुमची आणि संघातील अन्य खेळाडूंची स्वाक्षरी करून मला पाठवू शकता का?”

बाबरने या पत्राला त्याच्या ट्वीटरवरून रिट्वीट केले आहे आणि त्यात लिहिले आहे की, “प्रिय मोहम्मद हारून सुरुया, सलाम. या पत्रासाठी धन्यवाद, चॅम्पियन. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू ते सर्व मिळवू शकतो, जे तुला पाहिजे. फोकस, हार्डवर्क आणि स्वतःवर विश्वास तुला यश मिळवून देईल. तुला तुझ्या स्वाक्षऱ्या मिळतील, पण मी तुझी स्वाक्षरी घेण्यासाठी खूप इच्छूक आहे, भविष्यातील कर्णधार.”

दरम्यान, पाकिस्तान संघ टी२० विश्वचषकात एकही सामना न गमावता उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचला होता. मात्र, उपांत्य सामन्यात त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभव मिळाला आणि संघ स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. पाकिस्तान संघ विश्वचषकानंतर १९ नोव्हेंबरपासून बांगलादेशसोबत टी-२० मालिका खेळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

नाराज अख्तर आणि ‘त्या’ सूत्रसंचालकाची झाली दिलजमाई; केंद्रीय मंत्र्याने केली मध्यस्थी

‘माझी मुलगी आणि जावयाला वाईट बोलू नका’, हसन अलीच्या भारतीय सासर्‍यांची ट्रोलर्सला विनंती

ऑस्ट्रेलिया की न्यूझीलंड कोण जिंकणार टी२० विश्वचषक? सुनील गावसकरांनी केले भाकीत

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---