---Advertisement---

पुनरागमनासाठी गोलंदाज बनला बाबर आजम, पहिल्याच चेंडूवर स्टार फलंदाजाला केलं बाद!

On: शनिवार, ऑगस्ट 30, 2025 10:11 PM
---Advertisement---

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 नंतरपासूनच पाकिस्तानी सुपरस्टार बाबर आजमला (Babar Azam) टी20 संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यानंतर बाबरने वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये फलंदाजी करून पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण सर्वकाही करूनही तो अपयशी ठरत होता. मात्र आता बाबरने फलंदाजी बरोबरच चेंडूनेही कमाल केली आहे. बाबरने गोलंदाजी करत पहिल्याच चेंडूवर स्टार फलंदाजाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

पाकिस्तानातील अनेक भाग सध्या पुरामुळे गंभीररीत्या त्रस्त झाले आहेत. याच कारणास्तव पीएसएलची टीम पेशावर झाल्मीने इमरान खान स्टेडियमवर एक मैत्रीपूर्ण सामना खेळून निधी जमवण्याचा प्रयत्न केला. या सामन्यात पेशावरसमोर पाकिस्तान लिजेंड्स इलेव्हन मैदानात उतरली.

या सामन्यात बाबर आजमने प्रथम 23 चेंडूत 41 धावा ठोकत आपल्या संघाला 14.4 षटकांत 144 धावांपर्यंत पोहोचवले. त्यानंतर गोलंदाजीसाठी उतरलेल्या बाबर आजमने पहिल्याच चेंडूवर अजहर अलीला बाद केले. एवढेच नाही तर दिग्गज युनुस खानलाही क्लीन बोल्ड केले. बाबरने एकूण 3 षटकांत 21 धावा देत 2 बळी मिळवले.

लिजेंड्सच्या संघासाठी शाहिद आफ्रिदीने 3 बळी घेतले, तर सईद अजमल आणि मोहम्मद हफीज यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. फलंदाजीत इंजमाम उल हकने 23 चेंडूत 46 धावा ठोकल्या. तर अजहर महमूदने 15 चेंडूत 34 धावा केल्या. तरीदेखील पाकिस्तानी लिजेंड्स इलेव्हनला 6 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. बाबर आजमबाबत सांगायचे तर तो सध्या आशिया कप 2025 मध्ये संघाचा भाग नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---