पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम सध्या जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूपैकी एक आहे. तो सध्या आयसीसी एकदिवसीय आणि टी-२० क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज यांच्यात नुकत्याच खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेत त्याचे प्रदर्शन अप्रतिम राहिले होते आणि पाकिस्तानने मालिका देखील जिंकली होती. मागच्या वर्षी बाबरला आयसीसीने त्यांच्या सर्वोत्तम एकदिवसीय आणि टी-२० संघात निवडले होते. बाबरने याच संघाच्या कॅपसोबतचा एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मागच्या वर्षीच्या जबरदस्त प्रदर्शनानंतर बाबर आजम आयसीसीने निवडलेल्या सर्वोत्तम खेळाडूंच्या टी-२० आणि एकदिवसीय संघात सहभागी झाला होता. आता त्याने आयसीसीकडून या संघाच्या मिळालेल्या दोन्ही कॅप्ससोबतचा फोटो शेअर केला आहे. या इंट्साग्राम पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, मेहनतीचे फल मिळते.
https://www.instagram.com/p/Ce0hbFiLKEX/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, मागच्या वर्षी बाबर आजमच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघाचे प्रदर्शन कौतुकास्पद होते. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात बाबरच्या नेतृत्वातील संघाने पहिल्यांदा भारताला पराभूत केले. भारताविरुद्धचा हा सामना पाकिस्तानने एकही विकेट न गमावता जिंकला होता. वेस्ट इंडिजविरुद्ध नुकत्याच खेळलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानने विरोधी संघाला क्लीन स्वीप (३-०) दिला. आगामी काळात ऑस्ट्रेलियानमध्ये टी२० विश्वचषक खेळला जाणार आहे, ज्यामध्ये बाबरच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघाचे प्रदर्शन पाहण्यासारखे असेल.
बाबर आझमच्या कसोटी क्रमवारीचा विचार केला, तर तो ८१५ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत विराट कोहली ७४२ गुणांसह १० व्या क्रमांकावर आहे. एकदिवसीय क्रमावारीत बाबर ८९२ गुणांसह पहिल्या, तर विराट ८११ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. टी-२० क्रमावारीचा विचार केला, तर यामध्येही बाबर पहिल्या क्रमांकावर आहे आणि त्याच्याकडे ८१८ गुण आहेत. दुसरीकडे विराट मात्र या क्रमवारीत ५९४ गुणांसह २१ व्या क्रमांकावर आहे.
सध्या सुरू असेलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका मालिकेत विराट स्वतःचे टी२० प्रदर्शन उंचावू शकत होता. पण बीसीसीआयने भारताच्या वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेत विश्रांती दिली आहे. आता विराट इंग्लंडविरुद्ध १ जूनपासून खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यात मैदानात दिसेल. हा एकमात्र कसोटी सामना संपल्यानंतर भारताला इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळायची आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘आता दबाव आफ्रिकी संघावर’, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने दिले भारतीय संघाला बळ
राजकोटमध्ये टीम इंडियाचे ‘गुजराती’ स्वागत, पाहा व्हिडीओ
आयर्लंड दौऱ्यात निवड न झाल्याने दुखावला ‘राहुल’; ट्वीट करत मांडली व्यथा