---Advertisement---

बाबर-रिझवान न्यूझीलंडच्या बॉलिंगसमोर फेल, पाकिस्तानचा दारूण पराभव

---Advertisement---

टी20 विश्वचषकाआधी (T20 World Cup) न्यूझीलंडमध्ये तिंरगी मालिका खेळली जात आहेत. टी20 प्रकारच्या या मालिकेत पाकिस्तान संघाला मंगळवारी (11ऑक्टोबर) पराभवाचा सामना करावा लागला. या मालिकेच्या चौथ्या सामन्यात पाकिस्तान फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांमध्ये पूर्णपणे फ्लॉप झाला. या सामन्यात ना बाबर आझम चालला ना मोहम्मद रिझवान. गोलंदाजीतही नसीम शाह काही कमाल नाही दाखवू शकला. यामुळे पाकिस्तानला 9 विकेट्सने पराभूत व्हावे लागले आहे.

या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 130 धावा केल्या. यजमान संघाचे हे लक्ष्य 16.1 षटकात एक विकेट गमावतच पार केले. यावेळी न्यूझीलंडच्या विजयाचा नायक फिन ऍलन (Finn Allen) ठरला. त्याने 42 चेंडूत 62 धावा केल्या. त्याच्या या उत्तम खेळीत त्याने एक चौकार आणि 6 षटकार खेचले. डेवॉन कॉनवे हा देखील 46 चेंडूत 49 धावा करत नाबाद राहिला. गोलंदाजीतही न्यूझीलंडचा संघ वरचढ ठरल आहे. टीम साऊदी, ब्रेसवेल यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या आणि इश सोधीने एक विकेट घेतली.

या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी चूकीचा ठरवला. नेहमीप्रमाणे आझम-रिझवान जोडीने संथ गतीने सुरूवात केली. पाचव्याच षटकात रिझवान 16 धावा करत बाद झाला. त्याच्यानंतर 8व्याच षटकात शान मसून मिशेल सॅंटनरचा बळी ठरला. त्याने 14 धावा केल्या. त्यानंतर पाकिस्तानला लागोपाठ दोन धक्के बसले. शादाब खान 10व्या षटकात तर बाबर त्याच्या पुढच्याच षटकात 23 चेंडूत 21 धावा करत बाद झाला. त्यामुळे पाकिस्तानची स्थिती 5 विकेट्स गमावत 77 धावसंख्या अशी झाली. इफ्तिखार अहमद ने 27 आणि आसिफ अली याने 25 धावा केल्याने संघाने समाधानकारक धावसंख्या उभारली.

फलंदाजीबरोबर पाकिस्तानच्या गोलंदाजांनीही निराशा केली. फिन ऍलन याने तर विरोधी संघाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. आयसीसीने नुकतेच टी20 विश्वचषकातील सलामी जोडींची क्रमवारी जाहीर केली. त्यामध्ये बाबर-रिझवान या जोडीला अव्वल क्रमांक दिला आहे. या विजयामुळे तिंरगी मालिकेच्या गुणतालिकेत न्यूझीलंडने पहिले स्थान काबीज केले आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग: बीसीसीआयचा नवा अध्यक्ष जाहीर! सौरव गांगुलीनंतर ‘हे’ सांभाळणार पदाचा कार्यभार
भारताला विश्वविजेते बनवणारे गॅरी कस्टर्न टी20 वर्ल्डकपमध्ये ‘या’ संघाचे कोच

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---