---Advertisement---

आख्ख्या संघाला जे 11 वर्षात जमलं नाही, ते स्मिथने 5 दिवसात करून दाखवलं; आकडेवारी उडवेल तुमचीही झोप

On: शनिवार, जानेवारी 21, 2023 3:52 PM
Steve-Smith
---Advertisement---

सध्या  ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीग 2023 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत एकापेक्षा एक खेळाडू विक्रमावर विक्रम रचताना दिसत आहेत. आता या खेळाडूंमध्ये स्टीव्ह स्मिथ याच्या नावाचाही समावेश झाला आहे. स्टीव्ह स्मिथ बीबीएल स्पर्धेत अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. या स्पर्धेतील 50वा सामना शनिवारी (दि. 21 जानेवारी) सिडनी क्रिकेट ग्राऊंड येथे पार पडला. हा सामना सिडनी सिक्सर्स विरुद्ध सिडनी थंडर संघात खेळण्यात आला. या सामन्यात स्टीव्ह स्मिथ याने सलग दुसरे शतक झळकावले.

सिडनी सिक्सर्स विरुद्ध सिडनी थंडर (Sydney Sixers vs Sydney Thunder) संघातील या सामन्यात सिक्सर्सने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी सिडनी सिक्सर्स संघाकडून सलामीला स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि जोश फिलिप हे फलंदाज आले होते. मात्र, डावाच्या चौथ्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर जोश बाद झाला. त्यानंतर संघाचा डाव स्मिथने सावरला. यावेळी स्मिथने विरोधी संघाच्या गोलंदाजांची दाणादाण उडवली. त्याने यादरम्यान वादळी शतक साकारले.

स्मिथचे हंगामातील सलग दुसरे शतक
स्मिथ याने अवघ्या 56 चेंडूत शतक झळकावण्याची कामगिरी केली. हे शतक ठोकताना त्याने 3 चौकार आणि 8 षटकारांची बरसात केली. विशेष म्हणजे, स्मिथचे हे या हंगामातील सलग दुसरे शतक होते. त्याने यापूर्वी पाच दिवसांपूर्वीच म्हणजे 17 जानेवारी रोजी ऍडलेड स्ट्रायकर्सविरुद्ध खेळताना 56 चेंडूत 101 धावांची शतकी खेळी केली होती.

संघाने 11 हंगामात न केलेला विक्रम स्मिथने रचला
सध्या बिग बॅश लीगचा 12वा हंगाम खेळला जात आहे. याच हंगामात स्मिथने पाच दिवसाच्या अंतराने सलग 2 शतके झळकावली आहेत. त्यामुळे तो बीबीएल स्पर्धेच्या इतिहासात सिडनी सिक्सर्स या संघाकडून शतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरला आहे. विशेष म्हणजे, सिडनीला बीबीएलच्या 11 हंगामात एकही शतक झळकावता आले नव्हते.

स्मिथचे सामन्यातील योगदान
सिडनी थंडरविरुद्ध खेळताना स्मिथने नाबाद 125 धावांची खेळी साकारली. त्याने अवघ्या 66 चेंडूत 5 चौकार आणि 9 षटकारांचा पाऊस पाडत ही स्पर्धेतील त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावांची खेळी साकारली. (Back to back BBL hundreds for Steve Smith for sydney sixers)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हार्दिकच्या चपळाईपुढे डेवॉन कॉनवेची संयमी खेळी फेल, जबरदस्त झेल घेत दाखवला तंबूचा रस्ता
IND vs NZ | रोहित शर्माने दुसऱ्या सामन्यातही जिंकली नाणेफेक, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---