---Advertisement---

आशिया कपची सुरुवातच वादाने! लंकेचे खेळाडू-समर्थक प्रचंड भडकले, नेमकं काय झालं?

SL-vs-AFG-2
---Advertisement---

आशियातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा म्हणजेच आशिया चषकाला शनिवारी (27 ऑगस्ट) सुरुवात झाली. उद्घाटनाचा सामना अफगाणिस्तान व श्रीलंका यांच्या दरम्यान पार पडला. तब्बल चार वर्षानंतर होत असलेल्या या स्पर्धेची सुरुवात मात्र एका वादग्रस्त निर्णयाने झाली.

दुबई येथे सुरू झालेल्या आशिया चषकाच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्याच षटकात त्याचा हा निर्णय वेगवान गोलंदाज फजलहक फारुखीने योग्य ठरवला. त्याने पहिल्या षटकाच्या पाचव्या व सहाव्या चेंडूवर अनुक्रमे कुसल मेंडीस आणि चरीथ असलंका यांना बाद केले. त्यानंतर, नवीन उल हक टाकत असलेल्या दुसऱ्या षटकात दुसरा सलामीवीर पथुम निसंका हा यष्टीरक्षक रहमानुल्लाह गुरबाजच्या हाती झेल देत बाद झाला. मात्र, हा निर्णय अत्यंत वादग्रस्त राहिला.

दुसऱ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर निसंका याने पुढे येत फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू त्याच्या बॅटला स्पर्श न होता यष्टीरक्षकाकडे गेला. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी जोरदार अपील केल्यानंतर पंच अनिल चौधरी यांनी निसंका याला बाद ठरवले. मात्र, त्याने तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. तिसऱ्या पंचांनी रिप्ले व अल्ट्राएज पाहून गोलंदाजाच्या बाजूने निर्णय दिला. परंतु, अल्ट्राएजमध्ये चेंडूने बॅटला स्पर्श न केल्याचे स्पष्ट दिसत होते. तिसऱ्या पंचांच्या वादग्रस्त निर्णयामुळे श्रीलंका संघाचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड चांगलेच निराश झालेले दिसले. त्याचबरोबर श्रीलंकेचे खेळाडू व समर्थकांनी देखील टेलिव्हिजनवर उघडपणे आपली नाराजी हावभावद्वारे जाहीर केली. सोशल मीडियावर देखील या निर्णयाच्या अनेक प्रतिक्रिया दिसून आल्या.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘नादचं नाय!’ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स अँडरसनच्या नावावर; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केली खास कामगिरी
‘या’ फलंदाजांच्या जोरावर भारताने केलंय आशिया चषकावर राज्य, वाचा संपूर्ण यादी
पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानचा मास्टर स्ट्रोक! टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय, वाचा प्लेइंग11

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---