आयसीसी टी२० विश्वचषकातील ३८ वा सामना शनिवारी (०६ नोव्हेंबर) इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात पार पडला. या सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंड संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेऊन दक्षिण आफ्रिकेला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिका संघाने निर्धारित २० षटकात २ विकेट्सच्या मोबदल्यात १८९ धावांचा डोंगर उभा केला आणि इंग्लंडला १९० धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला मोठा धक्का बसला.
दक्षिण आफ्रिका संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंड संघाकडून सलामीला जेसन रॉय आणि जॉस बटलर हे खेळाडू फलंदाजी करत होते. दोन्ही खेळाडूंनी संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. ४थ्या षटकाअखेर दोन्ही खेळाडूंनी धडाकेबाज फलंदाजदी करत धावफलकावर ३७ धावा लावल्या होत्या. दरम्यान पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर इंग्लंड संघाच्या चिंतेत भर पडली. (Bad news for England as Jason Roy has pulled up and has to be carried off the field)
No yaar ,Jason Roy 😭😭😭.
One more injury for England.
HOPE JASON ROY WILL FINE 🤞.#ENGvSA pic.twitter.com/i44G6y8Dt0— ♡●𝑩𝒆𝒊𝒏𝒈 𝑺𝒉𝒐𝒂𝒊𝒃♡● (@drewmaccynt) November 6, 2021
दक्षिण आफ्रिकेकडून पाचवे षटक टाकण्यासाठी केशव महाराज आला होता. यावेळी त्याने पहिला चेंडू जॉस बटलरला टाकला. यावर बटलरने फटका मारला असता, धाव घेताना रॉय रिटायर्ड हर्ट झाला. त्याच्या डाव्या पायाला हॅमस्ट्रिंग झाली. त्यामुळे त्याला चालताना त्रास होत होता.
संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा…
दरम्यान, फिजिओ मैदानावर आले आणि त्याची तपासणी केली. त्याला जास्त त्रास होत असल्यामुळे तो मैदानातून बाहेर गेला. दरम्यान, रॉयने १५ चेंडूत २० धावा केल्या होत्या. यामध्ये ४ चौकारांचा समावेश होता.
😰 OH NO! 😰
Bad news for #England as Jason Roy has pulled up and has to be carried off the field.
England will hope it is not too serious but that doesn't look good. #SouthAfrica #T20WorldCup
📺 Watch 👉 https://t.co/bT0CP9Q8No
📱 Live blog 👇— Sky Sports Cricket (@SkyCricket) November 6, 2021
रॉय मैदानातून बाहेर गेल्यानंतर फलंदाजीला मोईन अली आला. यावेळी इंग्लंड संघाला विजयासाठी ९५ चेंडूत १५२ धावांची आवश्यकता होती.
महत्त्वाच्या बातम्या-
-‘हा’ भारतीय फलंदाज मोडतो विरोधकांचे कंबरडे; माजी पाकिस्तानी दिग्गजाने गायले गोडवे
-मुजीबसाठी भारतीयांनी देव ठेवले पाण्यात; ट्विटरवर होतोय ट्रेंड
-भारताचा ‘हा’ खेळाडू म्हणतोय, “विराट बुर्ज खलिफा, तर धोनी बुर्ज अल अरब”