भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या चारही सामन्यात जडेजाने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. दरम्यान मँचेस्टर कसोटी सामना कोरोनामुळे रद्द करण्यात आला आहे. आता रवींद्र जडेजा येत्या १९ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसून येणार आहे. दरम्यान, ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच जडेजासाठी एक वाईट बातमी समोर येत आहे.
रवींद्र जडेजा हा एक उत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. तर त्याची पत्नी रिवाबा ही भाजपची नेता आहे. तसेच त्याची बहीण नयनाबा काँग्रेस पक्षाची सदस्या आहे. आता या दोघींमध्ये मास्क न घातल्यामुळे युद्ध पेटले आहे. लोकमतमच्या वृत्तानुसार, रिवाबा आणि नयनाबा यांच्यातील वाद एका राजकीय कार्यक्रमादरम्यान सुरू झाला होता.
रिवाबाच्या एका कार्यक्रमात लोकांनी भरपूर गर्दी केली होती. या कार्यक्रमादरम्यान रिवाबाने मास्क व्यवस्थित घातला नव्हता. ज्यावर भाष्य करताना जडेजाच्या बहिणीने रिवाबावर जोरदार टीका केली होती. तिने टीका करताना असे देखील म्हटले होते की, हेच लोक गुजरातमध्ये तिसरी लाट येण्यासाठी जबाबदार असतील. इथूनच या प्रकरणाला सुरुवात झाली होती. दरम्यान, रिवाबाने आणि रवींद्र जडेजाने याबाबत कुठलीही प्रतिक्रिया दिली नाहीये.
तसेच ऑगस्ट २०२० मध्ये देखील रिवाबा मास्क न घातल्यामुळे चर्चेत आली होती. ज्यावेळी भारतात कोरोनामुळे भयानक स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी रिवाबा कारमधून मास्क न लावता बाहेर येताना दिसून आली होती. त्यावेळी पोलिसांनी तिला अडवून जाब देखील विचारला होता. त्यावेळी देखील वाद झाला होता.
तर, इंग्लंड विरुद्ध भारत अंतिम कसोटी सामना रद्द करण्यात आल्यामुळे, जडेजा लवकरच युएईला आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यासाठी रवाना होणार आहे. त्याच्याकडून या स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा असणार आहे. पहिली लढत मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये पार पडणार आहे. तसेच जडेजाची आगामी टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी देखील निवड झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
अंतिम सामन्यात पराभूत होऊनही बांगलादेशचा मोठा कारनामा; न्यूझीलंडविरुद्ध जिंकली ऐतिहासिक मालिका
‘या’ ३ गोलंदाजांचा अनुभव ठरला टी नटराजनवर भारी; हुकली टी२० विश्वचषकाची संधी
इंग्लंड-भारत संघातील पाचवा कसोटी तर रद्द, पण कसोटी चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेवर झाला का परिणाम?






