पुणे । सिमरन धिंग्रा, काश्वी केडिया, वीरा पोटफोडे, पवित्रा गड्डम यांनी महाराष्ट्रीय मंडळाच्या वतीने आयोजित हौशी खेळाडूंच्या बॅडमिंटन स्पर्धेतील १५ वर्षांखालील मुलींच्या गटात आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून तिसरी फेरी गाठली.
जोशीज बॅडमिंटन क्लब, देवधर बॅडमिंटन अकॅडमीच्या सहकार्याने व पुणे जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या मान्यतेने ही स्पर्धा टिळक रस्त्यावरील केळकर-भोपटकर हॉलमध्ये सुरू आहे. या स्पर्धेतील १५ वर्षांखालील मुलींच्या एकेरीच्या दुस-या फेरीत सिमरन धिंग्राने सुहानी भार्गववर १५-६, १५-२ असा, काश्वी केडियाने आयुषा लेकुलेवर १०-१५, १५-१०, १९-१७ असा, तर वीरा पोटफोडेने पृथा पांढरेवर १५-९, १५-६ असा विजय मिळवला.
यानंतर पवित्रा गड्डमने प्रणाली डोईफोडेचे आव्हान १२-१५, १५-८, १५-१० असे परतवून लावले. यानंतर नंदिनी पाटीलने द्विता डोंगरेवर १५-६, १५-५ अशी, तर कृतिका घोरपडेने केतकी बर्वेवर १५-२, १५-३ अशी मात केली. शर्वा बेद्रेने श्रीजनी सम्मादारवर १५-६,१५-७ अशी तर इरावती जोशीने अवनी भांगलेवर १५-१३, १७-१५ अशी मात करुन तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.
निकाल –
दुसरी फेरी – १३ वर्षांखालील मुली – स्वामिनी तिकोणे वि. वि. आर्या खुटळे १५-३, १५-०, ईशिता पाटील वि. वि. अवनी सप्रे १५-८, १६-१४, मृणाल देशमुख वि. वि. सई मुळ््ये १५-६, १५-२, रुही भिसे वि. वि. ऋचा बापट १५-९, १५-६, सई पाटणकर वि. वि. हर्डी मेहुल १५-७, १५-४, प्रणाली डोईफोडे वि. वि. श्रेया अन्विकर १५-७, १५-९, निशिता खिंवसरा वि. वि. आर्या नळे ९-१५, १५-११, १५-९, ज्ञानेश्वरी वायळ वि. वि. संस्कृती जोशी १३-१५, १५-८, १५-१०, सिया बेहेडे वि. वि. गार्गी वैद्य १५-१०, १५-१, सफा शेख वि. वि. ऋजुला गोखले १५-२, १५-३, पीयूषा फडके वि. वि. नेहा टेंबे १५-२, १५-२, अंजली कुलकर्णी वि. वि. श्रेया आगाशे १५-८, १६-१४, श्रींजनी समादार वि. वि. आद्य जोशी १५-११, १३-१५, १५-१०, संमती रूगे वि. वि. इरा आपटे १५-९, १५-९.
दुसरी फेरी – १७ वर्षांखालील मुली – सानवी राणे वि. वि. दिती चंडाक १५-१, १५-२, जान्हवी कुलकर्णी वि. वि. संयुक्ता माने १५-१०, १५-८, नर्मता सोलापुरे वि. वि. इरावती जोशी १५-८, १५-८, सई पळशिकर वि. वि. याना निबजिया १५-७, १५-४, भूमी वैशंपायन वि. वि. अहाना खरे १५-१०, १५-१२, वैष्णवी पिसे वि. वि. रिया कोबल १५-८, १५-११, शारवा बेद्रे वि. वि. अंतरा ढोरे १५-११, १५-१३, सायली पांडव वि. वि. सुहानी भार्गव १२-१५, १५-१०, १५-१२, आर्या मुळीक वि. वि. राधा लागू १५-६, १५-५, कृतिका घोरपडे वि. वि. सुविक्षा शेंदूरकर १५-९, १३-१५, १८-१६.