---Advertisement---

या मोठ्या दौऱ्यासाठी इंग्लंड संघाची घोषणा, दोन मोठ्या खेळाडूंना वगळले…

---Advertisement---

सोमवारी(23 सप्टेंबर) न्यूझीलंड दौऱ्यासाठी इंग्लंडच्या कसोटी आणि टी20 संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी जाॅनी बेयरस्टोला (Jonny Bairstow) आणि जेसन राॅयला (Jason Roy) कसोटी संघातून वगळण्यात आले आहे.

तसेच टी20 मालिकेसाठी राॅयला विश्रांती देण्यात आली आहे. त्याचबरोबर कसोटीतून जरी बेअरस्टोला वगळले असले तरी टी20 संघात त्याला संधी दिली आहे.

याचबरोबर टॉम बँटॉन, पॅट ब्राऊन, साकिब महमूद आणि मॅट पार्किन्सन यांना टी20 संघात पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. तसेच साकिब आणि पार्किन्सनला कसोटी संघातही संधी मिळाली आहे.

या दौऱ्यातील कसोटी संघातून बेअरस्टोला वगळल्याने जॉस बटलर यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळेल. तर त्याला पर्यायी यष्टीरक्षक म्हणून ऑली पॉपची कसोटी संघात निवड करण्यात आली आहे.

त्याचबरोबर कसोटी संघात डॉमनिक सिब्ले आणि जॅक क्राॅले यांचीही निवड करण्यात आली आहे.

ऑक्टोबरमध्ये इंग्लंडचा संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे. इंग्लंड या दौऱ्यात न्यूझीलंडबरोबर 2 कसोटी आणि 5 टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहेत.

न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा संघ- 

जो रूट (कर्णधार), जोफ्रा आर्चर, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जॉस बटलर, जॅक क्राॅले, सॅम करन, जो डेन्ली, जॅक लीच, साकीब महमूद, मॅट पार्किन्सन, ऑली पॉप, डोमिनिक सिब्ले, बेन स्टोक्स, ख्रिस वॉक्स

न्यूझीलंडविरुद्ध टी20 मालिकेसाठी इंग्लंडचा संघ- 

ऑयन मॉर्गन (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, टॉम बँटॉन, सॅम बिलिंग्स, पॅट ब्राउन, सॅम करन, टॉम करन, जो डेन्ली, लुइस ग्रेगॉरी, ख्रिस जॉर्डन,साकिब महमूद, डेविड मलान, मॅट पार्किन्सन, आदिल रशीद, जेम्स विन्स.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

सुरक्षेच्या भीतीनंतरही श्रीलंकेचा संघ वनडे, टी२० सामन्यांसाठी पाकिस्तानला रवाना

टीम इंडियाला कसोटी मालिकेआधी मोठा धक्का, हा मोठा खेळाडू झाला संघाबाहेर

कृणाल पंड्या सांभाळणार या संघाचे कर्णधारपद

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment