---Advertisement---

टीम इंडियाला कसोटी मालिकेआधी मोठा धक्का, हा मोठा खेळाडू झाला संघाबाहेर

On: मंगळवार, सप्टेंबर 24, 2019 5:20 PM
---Advertisement---

2 ऑक्टोबरपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. मात्र ही मालिका सुरु होण्यापूर्वीच भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बाहेर पडला आहे.

त्याच्याऐवजी वेगवान गोलंदाज उमेश यादवचा संघात समावेश करण्यात आला आहे. बुमराहला या कसोटी मालिकेआधी दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या टी20 मालिकेसाठीही आराम देण्यात आला होता.

त्याच्यावर आता बीसीसीआयची वैद्यकीय टीम लक्ष ठेवणार असून तो आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये ट्रेनिंग करेल.

त्याच्याऐवजी भारताच्या कसोटी संघात निवड झालेला उमेश यादव याआधी शेवटचा कसोटी सामना डिसेंबर 2018 ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला आहे.

असा आहे भारताचा कसोटी संघ – 

विराट कोहली (कर्णधार), मयंक अगरवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान सहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, शुभमन गिल.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

कृणाल पंड्या सांभाळणार या संघाचे कर्णधारपद

२००७ टी२० विश्वचषकाच्या फायनलचा हिरो सध्या करतो काय?

ती एक चूक विराट कोहलीला पडली महागात आयसीसीने सुनावली ही मोठी शिक्षा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment