---Advertisement---

कुस्तीपटू बजरंग पुनियाची कमाल, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय

On: सोमवार, सप्टेंबर 19, 2022 12:29 PM
Bajrang Punia
---Advertisement---

भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया याने बेलग्रेडमध्ये सुरु असलेल्या जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्य पदक जिंकले आहे. ऑलिम्पिकच्या कांस्य पदक विजेत्याने भारताला या स्पर्धेत दुसरे पदक जिंकून दिले आहे. त्याच्याआधी महिला कुस्तीपटू विनेश फोगट हीने कांस्य पदक जिंकले. कॉमनवेल्थ गेम्स 2022चा सुवर्णपदक विजेता पुनिया याने 65 किलो वजनी गटात हे कांस्य पदक जिंकले. त्याने पुएर्टो रिकोच्या सेबस्टियन रिवेरा याला 11-9 असे पराभूत केले.

बजरंग पुनिया (Bajrang Punia) याचे जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धेतील हे चौथे पदक आहे. त्याने 2018मध्ये रौप्य पदक जिंकले, तर 2013 आणि 2019मध्ये कांस्य पदक जिंकले आहे. जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धेत चार पदके जिंकणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे.

https://twitter.com/Media_SAI/status/1571557917954043904?s=20&t=1cdHOBPRyToP4C4yODB04A

बजरंगला उपांत्यपूर्व फेरीत जॉन दियाकोमिहालिस याच्याविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर त्याने रेपचेजमध्ये कांस्य पदक जिंकले. रेपचेजच्या सुरूवातीला पराभूत झालेल्या खेळाडूला आणखी एक संधी दिली जाते. तसेच तो खेळाडू ज्याच्याकडून पराभूत झाला त्या विजेत्याने अंतिम सामन्यात जागा पक्की केली, तर त्याला कांस्य पदक जिंकण्याची संधी असते. 28 वर्षाच्या या खेळाडूला सेबस्टियन रिवेरा याच्याविरुद्ध 6-0 असा मागे होता. नंतर त्याने जोरदार पुनरागमन करत कांस्य पदकावर आपला हक्क दाखवला.

https://twitter.com/RailMinIndia/status/1571709442361819136?s=20&t=1cdHOBPRyToP4C4yODB04A

या स्पर्धेत भारताचे 30 सदस्यांनी भाग गेतला आहे, मात्र यातील दोघांनीच पदके जिंकली आहेत. तर काही भारतीय खेळाडूंचे प्रदर्शन खूपच खराब राहिले आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत भारताचे पारडे जड, पण ‘हे’ आकडे पाहून वाढले चाहत्यांचे टेंशन
भारतीय संघासाठी मोठी बाधा ठरणार पॅट कमिन्स! म्हणतोय, ‘विश्रांतीनंतर आता…’
LLC: भिलवाडा किंग्सच्या विजयात कॅरेबियन्स चमकले! युसुफची पुन्हा मॅचविनिंग खेळी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---