इंग्लंडमधील बर्गिमहॅम येथे 22वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत भारताचे खेळाडू अतिशय चमकदार कामगिरी करत आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेचा आठवा दिवस भारताच्या सर्व कुस्तीपटूंनी अक्षरशः गाजवत पदकांचा पाऊस पाडला. भारताने स्पर्धेच्या आठव्या दिवशी तब्बल तीन सुवर्णपदके खिशात घातली, यासह एक रौप्य आणि दोन कांस्यपदकेही जिंकली आहेत.
आतापर्यंत भारताच्या एकूण सहा कुस्तीपटूंनी पदके जिंकली असून एकूण पदसंख्या ही 25वर पोहोचली आहे. पुरुषांमध्ये बजरंग पुनिया, दीपक पुनिया तर महिलांमध्ये साक्षी मलिक यांनी सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. तसे पाहता भारताला यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील पहिले पदक हे कुस्तीपटू अंशू मलिकने मिळवून दिले, पण तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. यासह, पुरुषांच्या 125 किलोग्राम वजनी गटात मोहित ग्रेवालने कांस्य पदक जिंकले. तर, महिलांच्या 68 किलोग्राम वजनी गटात दिव्या काकरनने कांस्य पदक मिळवले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
BREAKING: एका तासात कुस्तीत भारताला तीन गोल्ड; बजरंग-साक्षीपाठोपाठ दीपक पुनियाने रचला इतिहास
BREAKING: साक्षीने पूर्ण केल्या देशवासीयांच्या अपेक्षा; बर्मिंघममध्ये मिळवले सोनेरी यश
BREAKING: बजरंगाची पुन्हा कमाल! मारली कॉमनवेल्थ मेडलची हॅट्रिक