भारतीय कुस्तीपटू आणि बृजभूषण सिंग यांच्यातील वात पुन्हा एकदा तापल्याचे दिसत आहे. मागील काही महिन्यांपासून कुस्तीपटू महिला न्यायासाठी लढा देत आहेत. पण गुरुवारी (22 डिसेंबर) संयज सिंग भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपती विचारजमान झाल्यानंतर या कुस्तीपटूंमध्ये नाराजी पाहायला मिळाली. याच पार्श्वभूमीवर बजरंग पुनिया याने भारत सरकाराचा पद्मश्री पुरस्कार परत करण्याचे धाडसी पाऊल उचलले आहे.
भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू म्हणून बजरंग पुनिया जगभरात ओळखला जातो. जानेवारी 2023मध्ये भारतीय महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंग यांच्याविरोधात आंदोलनाला सुरुवात केली. आंदोरनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार भारतीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष बृजभूषण यांनी महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केला होता. पण याप्रकरणात पुढचे काही महिने कुठलीच कारवाई झाली नाही. अखेर कुस्तीपटूंनी काही महिन्यानंतर उच्च न्यायलायत धाव घेतल्यानंतर बृजभूषण यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आली. असे असले तरी, भाजपचे दिग्गज नेते आणि खासदार बृजभूषण यांच्यावरील एकही आरोप अध्याप सिद्ध झाला नाहीये.
कुस्तीपटूंच्या गंभीर आरोपांची दखल घेत न्यायलायने बृजभूषण यांचा कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मात्र घेतला. तसेस अध्यक्षपदाच्या आगामी निवडणुकीत त्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील कुणाला उभे राहता येणार नाही, असेही सांगितले. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी पार पडलेल्या भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत बृजभूषण किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणीही प्रत्यक्षपणे उभे राहिले नव्हते. पण अध्यक्षपती नव्याने नियुक्त झालेले संजय सिंग बृजभूषण यांचेच निकटवर्तीय आहेत.
याच पार्श्वभूमीवर गुरुवारी भारतीय कुस्तीपटू साक्षी मलिक हिने कुस्तीमधून निवृत्तीची घोषणा केली. या सर्व प्रकारामुळे वातावरण गरम असतानाच बजरंग पुनिया यानेही पद्मश्री पुरस्कार माघारी देण्याचा निर्मय घेतला आहे. त्याने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यामातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेले पत्र सर्वांसोबत शेअर केले आहे. त्याने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी माझा पद्मश्री पुरस्कार पंतप्रधानांना परत करत आहे. हे पत्र केवळ एक ओपचारिकता आहे.”
दरम्यान, गुरुवारी झालेल्या भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत संयज सिंग यांच्यासमोर अध्यक्षपदासाठी माजी कुस्तीपटू अनिता श्योरान उभ्या होत्या. 47 पैकी 40 मते संजय यांना, तर 7 सात मते अनिता यांना मिळाल्याचे माहिती माध्यमांमध्ये आहे. (Bajrang Punia has decided to return the Padma Shri award)
महत्वाच्या बातम्या –
IND vs SA । संजू सॅमसनचा मोठा खुलासा; म्हणाला, ‘मागच्या तीन-चार महिन्यात मानसिक…’
2023 । सरत्या वर्षात दिसला भारतीयांचा जलवा, पाहा कोणत्या पाच खेळाडूंनी केल्या सर्वाधिक धावा