---Advertisement---

… म्हणून बजरंग पुनियाने लग्नाचा स्वागत समारंभ केला रद्द

On: रविवार, नोव्हेंबर 29, 2020 12:07 AM
---Advertisement---

भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि संगीता फोगट यांचा लग्न समारंभ बुधवारी (25 नोव्हेंबरला) बलाली गावात मोठ्या थाटामाटात आणि अगदी साधेपणाने पार पडला. या लग्न समारंभात जवळचे नातेवाईक आणि मित्र उपस्थित होते.

या नवविवाहित दाम्पत्याने शुक्रवारी (27 नोव्हेंबर) स्वागत समारंभ आयोजित केला होता. मात्र, काही कारणात्सव हा समारंभ रद्द करण्यात आला.

बजरंग पुनियाने स्वतः याबद्दल माहिती दिली आहे. त्याने आपल्या वॉट्सअप स्टेटसद्वारे सांगतिले की, “माहिती देताना बजरंग यांनी लिहिले की, “27 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या माझ्या लग्नाचा स्वागत समारंभ सोहळा स्थगित करत आहे. सध्या सुरू असलेल्या शेतकरी चळवळीमुळे तुमच्या सुरक्षेचा विचार करून उचलले आहे. तुमच्या गैरसोयीबद्दल मला खेद आहे.”

लग्नाआधी बजरंग पुनियाचे वडील बलवान सिंग यांनी सांगितले होते की, लग्न मोठ्या थाटामाट्याने पार पाडण्याची तयारी केली होती. झज्जरमधील खुद्दन गावात पाच एकर जागेत मंडप उभारून जेवणाचा कार्यक्रम आयोजित करायचा होता. पण कोरोनामुळे ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही आणि लग्नाचा कार्यक्रम मर्यादित ठेवावा लागला. लग्नाला कोणालाही आमंत्रित केले नाही. आता लग्न साधेपणाने होईल. बजरंगच्या बाळाच्या जन्मावेळी किंवा पदक जिंकल्यास मोठा कार्यक्रम आयोजित केला जाईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---