---Advertisement---

सात नाही तर आठ फेरे घेत संगीता फोगट, बजरंग पुनिया अडकले विवाहबंधनात, पाहा फोटो

---Advertisement---

‘दंगल गर्ल’ गीता आणि बबीता फोगट यांची छोटी बहीण संगीता आणि पद्मश्री पुरस्कार विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया यांचा बुधवारी(२५ नोव्हेंबर) विवाहसोहळा पार पडला. जवळच्या नातेवाईकांच्या आणि मित्रपरिवाच्या उपस्थितीत चरखी ददरी जिल्ह्यातील बलाली गावात हा सोहळा पार पडला.

कोरोना व्हायरचा धोका लक्षात घेत लग्नासाठी मर्यादीत पाहुणे उपस्थित

सध्या भारतात असलेला कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेत संगीता आणि बजरंग या दोघांच्याही कुटुंबियांनी पाहुण्यांची संख्या मर्यादीत ठेवली होती. बजरंग केवळ 31 वराती घेऊन आला होता. त्यांच्या लग्नसंमारंभाचे अनेक फोटो सध्या व्हायरल होत आहेत. संगीताच्या बहीणी गीता आणि बबीता यांनी देखील या लग्नसोहळ्यातील फोटो शेअर केले आहेत.

https://www.instagram.com/p/CH9YBaRA9gs/

https://www.instagram.com/p/CIAW5OUncTg/

मागच्या वर्षी झाला होता साखरपूडा –

बजरंग आणि संगीता यांचे लग्न मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये पक्के झाले होते. त्यांचा कुटुंबियांच्या उपस्थितीत साखरपूडा झाला होता. तसेच त्यांनी टोकियो ऑलिंपिक २०२०नंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कोरोना व्हायरसच्या कारणाने टोकियो ऑलिंपिक १ वर्षाने पुढे ढकलण्यात आले. त्यामुळे त्या दोघांनी यावर्षी २५ नोव्हेंबरला लग्न करण्याचे निश्चित केले होते.

https://www.instagram.com/p/CH9MGfaAcop/

संगीता आणि बजरंग दोघेही कुस्तीपटू –

संगीता आणि बजरंग हे दोघेही आंतरराष्ट्रीय स्थरावर कुस्ती खेळतात. बजरंग टोकियो ऑलिंपिकसाठी देखील पात्र ठरला आहे. तसेच तो लग्नानंतर काही दिवसांनी ट्रेनिंगसाठी युएसएला जाणार आहे.

संगीता आणि बजरंगने घेतले ८ फेरे –

संगीता आणि बजरंगने सप्तपदीबरोबरच एक फेरा ज्यादाचा घेतला. त्यांनी ८ वा फेरा ”मुली वाचवा मुली शिकवा’ या संकल्पासह पूर्ण केला. याआधी गीता आणि बबीता यांनी देखील त्यांच्या लग्नात ८ फेरे घेतले होते.

महत्त्वात्या बातम्या –

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार की नाही? पाहा काय घेतलाय कुस्तीगीर परिषदेने निर्णय

‘दंगल गर्ल’ बबीता फोगट होणार आई, फोटो शेअर करत दिली ‘गुड न्यूज’

…म्हणून WFI ने महिला राष्ट्रीय शिबिर रद्द करण्याचा घेतला निर्णय

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---