भारतीय संघाला तीन ऑलिंपिक्स सुवर्णपदक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बलवीर सिंग (सिनीयर) यांचे आज निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. त्यांनी भारतीय हाॅकी संघाचे कर्णधारपदही भुषवले होते.
९ मे रोजी त्यांना मोहाली येथील फोर्टिस हाॅस्पिटलमध्ये दाखल केले होते.
९५ वर्षीय बलवीर सिंग यांना गेल्यावर्षी श्वसनाच्या त्रासामुळे एक आठवडा चंदीगढ येथील पीजीआयएमईआरमध्ये होते. त्यांना गेले काही दिवस श्वास घ्यायला त्रास होत होता. एकंदरीत त्यांची परिस्थीती अतिशय खराब होती.
बलवीर सिंग यांनी १९४८मध्ये लंडन, १९५२मध्ये हेलसिंकी व १९५६मध्ये मेलबर्न ऑलिपिंक्समध्ये भारताला सुवर्णपदक मिळवुन देताना मोठी भूमिका निभावली होती.
https://www.facebook.com/TheHockeyIndia/photos/a.258226570956583/2869447649834449/?type=3&__xts__%5B0%5D=68.ARDQROYP1Ne-Vl4tyFWjM8om1GaHRs8WP-_aXiFr1xXJQC3NqTT0RQ_6oMdefYv6W8eo7SKX_OToLkZajlnoSMf7xg-Ony2XnJ0zvIiF9mpecpoQEwxLC2rPB38ecs72JySwpQftSaAgSlIJY8hqI07WQkuLU7fAGX6Sci9_zJqVvbi5Cvb8ojb_PHjRqOwu5hFWYKyXTRVoBx_RzHEYGqFdVx1CVm5i3mPR6RWgT9db0867BCEjA2-RsKlwVuycFNsUp0lb1CLpVyw86Kp4DqSowqPw_ER7xEUceXK–6VNpTq1V0LFCQKrPd-uOhvfzgIM8TXL23Fp544zCA3034KtSg&__tn__=-R
१९५२मध्ये हेलसिंका ऑलिंपिक्समध्ये भारताने नेदरलॅंड्सला ६-१ने पराभूत केले होते. यात बलवीर सिंग यांनी ५ गोल केले होते. तो विक्रम आजही त्यांच्या नावावर कायम आहे. १९७५मध्ये विश्वविजेतेपद मिळविणाऱ्या भारतीय हाॅकी संघाचे ते मॅनेजर होते.
त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.