बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत एक अनोखा विक्रम केला आहे. एकाच संघाविरुद्ध सलग दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये समान आकडे असणारा शाकिब जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.
शाकीबने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या टी-२० मध्ये १७ चेंडूत २६ धावा केल्या होत्या. याव्यतिरिक्त गोलंदाजीमध्ये त्याने चार षटकांत २२ धावा दिल्या आणि १ विकेट मिळवली. यानंतर शुक्रवारी (६ ऑगस्ट) खेळलेल्या तिसऱ्या टी-२० मध्ये त्याने फलंदाजीत १७ चेंडूत २६ धावा केल्या आणि गोलंदाजीमध्ये चार षटकांत २२ धावा देऊन १ विकेट मिळवली. यापुर्वी कोणत्याही क्रिकेटपटूला अशी अनोखी कामगिरी करता आलेली नाही.
तिसऱ्या टी-२० सामन्यामध्ये बांगलादेशने ऑस्ट्रेलियाचा १० धावांनी पराभव केला. यासह बांगलादेशने मालिकेत ३-० अशी निर्विवाद आघाडी घेतली आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने ९ खेळाडू गमावून १२७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने निर्धारित षटकांत ४ खेळाडू गमावून ११७ धावा केल्या. बांगलादेशने कोणत्याही स्वरूपात द्विपक्षीय मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
Shakib Al Hasan is the first ever player with completely identical scores and bowling figures in consecutive T20Is against the same team.
During 2nd T20I vs AUS
26(17) with the bat
4-0-22-1 with the ballDuring 3rd T20I vs AUS
26(17) with the bat
4-0-22-1 with the ball#BANvAUS— Kausthub Gudipati (@kaustats) August 7, 2021
शाकिब अल हसनची कामगिरी
शाकिब अल हसन हा एक बांगलादेशी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे. जो एका दशकासाठी खेळातील तिन्ही स्वरूपात सातत्याने आयसीसीचा अव्वल अष्टपैलू खेळाडू राहिला होता. विस्डेन क्रिकेटनेही त्याला शतकाचा दुसरा सर्वात मौल्यवान खेळाडू म्हणून स्थान दिले आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये तो कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग आहे. तर २०१८ च्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्याला सनरायझर्स हैदराबादने लिलावात खरेदी केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
त्या राहुल सारखाच हा राहुल आहे; ‘या’ दिग्गज गोलंदाजाने द्रविडशी केएलची केली तुलना
ऑसी गोलंदाजाने टी२० पदार्पणातच केला हॅट्रिकचा कारनामा, तरीही संघ बांगलादेशविरुद्ध पराभूत
रेकॉर्ड अलर्ट! शमी आणि बुमराहकडे आज तीन भारतीय दिग्गजांना मागे टाकण्याची संधी