पाकिस्तानचा संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर असून उभय संघांमध्ये नुकतीच ३ सामन्यांची टी२० मालिका पार पडली आहे. बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान यांच्यात ढाका येथे झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी२० सामन्यात पाकिस्तानने ५ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह पाकिस्तानने ३-० च्या फरकाने टी२० मालिकाही खिशात घातली. या सामन्यातील शेवटच्या षटकात विशेषकरुन अखेरच्या चेंडूवर मोठा ड्रामा पाहायला मिळाला. यानंतर पाकिस्तानच्या सामना विजयावरही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
त्याचे झाले असे की, या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने ७ विकेट्सच्या नुकसानावर १२४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या संघाला विसाव्या षटकात विजयासाठी ८ आवश्यकता होती. मात्र पाकिस्तान संघासाठी हे षटक अतिशय महागडे राहिले. त्यांना या षटकातील ५ चेंडूंवर केवळ ६ धावा करता आल्या. यादरम्यान संघाने ३ विकेट्सही गमावल्या.
आता शेवटच्या चेंडूवर पाकिस्तान संघाला विजयासाठी २ धावा पाहिजे होत्या. बांगलादेशच्या महमुदुल्लाहने हा अखेरचा चेंडू फेकला. परंतु स्ट्राईकवर असलेला पाकिस्तानी फलंदाज मोहम्मद नवाज चेंडूला हिट न करता यष्टीपुढून सरकला आणि चेंडूने थेट त्याच्यामागील यष्ट्या उडवल्या. यावर बांगलादेशच्या खेळाडूंनी विकेटसाठी अपील केली, परंतु पंचांनी त्यांची मागणी फेटाळली. त्यामुळे पुन्हा शेवटचा चेंडू टाकला गेला आणि यावर मोहम्मद नवाजने चौकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला.
यावर क्रिकेटविश्वातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी पाकिस्तान संघावर यावरुन निशाणा साधला आहे. तो शेवटचा टाकणाऱ्या बांगलादेशी गोलंदाज महमुदुल्लाहने यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “मोहम्मद नवाज अगदी शेवटच्या क्षणाला मागे सरकला. यावर मी पंचांना विचारले की हा चेंडू योग्य आहे का? यावर त्यांनी नकार दिला. आम्ही पंचांच्या निर्णयाचा सन्मान करतो. त्यांचा निर्णय आमच्यासाठी शेवटचा निर्णय असतो.” विशेष म्हणजे, बांगलादेशचे पंच तनवीर अहमद यांनीच हा निर्णय दिला होता.
The last ball drama!!
Congratulations #Pakistan for the #PakWash and best wishes for #Bangladesh. Although Mahmudullah performed well, BCB has a lot to do for real progress.#BANvPAK #PAKvBAN #BrotherhoodWon pic.twitter.com/kWGEeSjW3W— Nznn Ahmed (@na_nznn) November 22, 2021
दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना ७ विकेट्सच्या नुकसाावर १२४ धावा केल्या होत्या. बांगलादेशकडून सलामीवीर मोहम्मद नईमने सर्वाधिक ४७ धावा केल्या होत्या. बांगलादेशच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानकडून सलामीवीर मोहम्मद रिझवान (४० धावा) आणि हैदर अली (४५ धावा) यांच्या खेळी संघासाठी उपयुक्त ठरल्या. पाकिस्तानने ५ विकेट्स राखून शेवटच्या चेंडूवर हा सामना जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या-
अश्विन म्हणतोय केवळ त्यालाच नाही, तर ‘या’ प्रमुख खेळाडूलाही दिल्ली कॅपिटल्स संघात कायम करणार नाही
टीम पेनचा राजीनामा, आता ‘हे’ ३ खेळाडू होऊ शकतात ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचे नवे कर्णधार
तामिळनाडूने विजेतेपद पटकावताच दिनेश कार्तिक भावूक, ट्विट करत दोन वर्षांपूर्वी आठवणींना दिला उजाळा