---Advertisement---

टीम पेनचा राजीनामा, आता ‘हे’ ३ खेळाडू होऊ शकतात ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचे नवे कर्णधार

On: मंगळवार, नोव्हेंबर 23, 2021 3:57 PM
Crickt Australia Pat Cummins
---Advertisement---

ऍशेस कसोटी मालिकेच्या १६ दिवस आधी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा झटका बसला आहे. संघाचा कर्णधार टीम पेनने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. टीम पेन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रूही वाहत होते. तो म्हणाला, ‘तो म्हणाला, ‘मी ऑस्ट्रेलिया पुरुष क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देत आहे. हा खूप कठीण निर्णय आहे, पण माझ्या कुटुंबासाठी आणि क्रिकेटसाठी योग्य आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पेनने २०१७ मध्ये एका मुलीला त्याचे अश्लील फोटो आणि मेसेज पाठवले होते, जे आता व्हायरल झाले आहेत. बोर्डाने पेन यांचा राजीनामा स्वीकारला आहे. स्टीव्ह स्मिथच्या जागी २०१८ मध्ये टीम पेनला ४६ वा ऑस्ट्रेलियन कसोटी कर्णधार बनवण्यात आले होते.

टीम पेन कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर अनेक वर्षे ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार म्हणून काम पाहणारा पॅट कमिन्स कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारण्यात आघाडीवर आहे. जर त्याला कर्णधार करण्यात आले, तर पॅट कमिन्स हा ऑस्ट्रेलियाचा ४७ वा कसोटी कर्णधार असेल आणि ६५ वर्षात ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचे नेतृत्व करणारा पहिला वेगवान गोलंदाज होईल. पण अजून कर्णधारपदाबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

तरी, टीम पेनने कर्णधारपद सोडल्यास ऑस्ट्रेलियाचे कमिन्ससह कोणते तीन खेळाडू संघाचे कर्णधार होऊ शकतात, याचा या लेखात आढावा घेऊ

१. पॅट कमिन्स
टीम पेननंतर ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा पुढचा कर्णधार कोण, हा प्रश्न सर्वांच्या मनात घोळत आहे. अशा परिस्थितीत संघाच्या उपकर्णधाराचे नाव शर्यतीत सर्वात पुढे आहे. पॅट कमिन्स हा ३ वर्षे संघाचा उपकर्णधार आहे. टीम पेनच्या जागी त्याचे नाव आघाडीवर आहे. कमिन्स दीर्घकाळापासून ऑस्ट्रेलियाची सेवा करत आहे. पेन कर्णधार असतानाही त्याच्यानंतरच्या कर्णधारासाठी कमिन्सचे नाव पुढे होते.

कमिन्स हा उजव्या हाताचा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आणि हिटर फलंदाज आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा प्रमुख गोलंदाज पॅट कमिन्सही गरजेच्या वेळी चांगली फलंदाजी करतो. आयपीएल २०२१ मध्येही त्याने केकेआरसाठी देखील स्फोटक खेळी खेळली होती. कमिन्सने आपल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत ३४ सामने खेळले असून २१.६ च्या सरासरीने १६४ बळी घेतले आहेत

त्याच वेळी, जेव्हा कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजीचा विचार केला तर कमिन्सने एकूण ७०८ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून २ अर्धशतकेही झळकली आहेत. कमिन्सला आतापर्यंत संघाच्या कर्णधारपदाची संधी मिळाली नसेल, पण टीम पेनच्या कर्णधाराच्या बाबतीत, तो दीर्घकाळ संघाचा उपकर्णधार राहिला आहे.

अशा परिस्थितीत कमिन्स कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन कर्णधार होणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेटमधील गोलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत कमिन्स जवळपास दोन वर्षांपासून अव्वल स्थानावर आहे.

२. मार्नस लॅब्युशेन
ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार होण्याच्या शर्यतीत युवा फलंदाज मार्नस लॅब्युशेनचे नावही सामील आहे. लॅब्युशेनने आपल्या फलंदाजीने खूप प्रभावित केले आहे. त्याने कारकिर्दीला सुरुवात केली, तेव्हापासून तो संघासाठी सातत्याने धावा करत आहे. तो तरुण आहे आणि त्यामुळे त्याच्या फॉर्ममध्ये संघाला लांब पल्ल्याचा घोडा मिळू शकतो. दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला लब्युशेन २००४ मध्ये ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन शहरात स्थायिक झाला आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघासाठी कसोटी क्रिकेट खेळू लागला.

मार्नस लॅब्युशेनने ७ ऑक्टोबर २०१८ रोजी कसोटी पदार्पण केले. त्याने १८ सामन्यांच्या ३१ डावात ६०.८१ च्या सरासरीने १८८५ धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने ५ शतके आणि १० अर्धशतके केली आहेत. त्याच्या नावावर कसोटीत द्विशतक आहे. त्याचबरोबर वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या २१५ धावांची आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेटमधील फलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत तो सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. तो कसोटी सामन्यांमध्ये मोठ्या खेळी खेळण्यासाठी ओळखला जातो.

३.स्टीव्ह स्मिथ
ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कसोटी कर्णधार स्टीव्ह स्मिथ देखील टीम पेनची जागा घेऊ शकतो. चेंडू छेडछाडीच्या वादात स्मिथ अडकल्यानंतर पेनकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. मात्र, स्मिथच्या कर्णधारपदावरील आता बंदीही उठवण्यात आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि देशातील अनेक माजी दिग्गजांमध्ये, स्मिथला परत कर्णधार करण्यात यावे अशी चर्चा होती. अशा परिस्थितीत स्मिथला कर्णधारपद मिळाले तर नवल वाटणार नाही.

साल २०१५ च्या ऍशेस मालिकेत इंग्लंडकडून ३-२ असा पराभव पत्करावा लागल्यानंतर मायकेल क्लार्कने क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. त्यानंतर स्मिथ ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा पूर्णवेळ कर्णधार बनला.

तथापि, 2018 मध्ये चेंडू छेडछाड प्रकरणात अडकण्यापूर्वी स्टीव्ह स्मिथने संघाचे नेतृत्व केले आहे आणि तो संघाचा एक चांगला कर्णधार असल्याचेही सिद्ध झाले आहे. ३४ कसोटी सामन्यात कर्णधार असताना संघाने १८ सामने जिंकले आहेत, तर १० सामने गमावले आहेत, तसेच ६ सामने अनिर्णित राहिले आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये, स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाच्या विजयाची टक्केवारी ५२.९४% आहे. स्मिथ हा या संघाचा सर्वात मोठा फलंदाज आहे. या फलंदाजाने ७७ सामन्यात ६१.८ च्या सरासरीने ७५४० धावा केल्या आहेत. सध्या हा दिग्गज फलंदाज कसोटी क्रिकेटमधील फलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. स्मिथ बराच काळ पहिल्या स्थानावर होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

अश्विन म्हणतोय केवळ त्यालाच नाही, तर ‘या’ प्रमुख खेळाडूलाही दिल्ली कॅपिटल्स संघात कायम करणार नाही

तुफानी फलंदाजी! वनडेमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा करणारे ५ फलंदाज

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूवर षटकार मारून संघाला विजय मिळवून देणारे ६ फलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---