भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात बांगलादेश महिला विरुद्ध भारत महिला संघात 3 टी20 आणि 3 वनडे सामन्यांची मालिका खेळली जात आहे. टी20 मालिका पार पडली असून वनडे मालिकेतील अखेरचा सामना ढाका येथे खेळला जात आहे. तत्पूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. बांगलादेश संघाची कर्णधार निगर सुलताना हिने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला.
अटीतटीचा सामना
बांगलादेश महिला विरुद्ध भारत महिला (Bangladesh Women vs India Women) संघातील तिसरा वनडे सामना खूपच महत्त्वाचा आहे. कारण, 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना बांगलादेश संघाने जिंकला होता. तसेच, दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवण्यात यश आले होते. अशात हा सामना कोणता संघ जिंकतोय, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
A look at #TeamIndia's Playing XI for the third and final ODI 👌👌
Live Stream 📺 – https://t.co/lqRXIECtlj
Follow the Match – https://t.co/GNp3lOF8JP #BANvIND pic.twitter.com/J1xA3L8sw9
— BCCI Women (@BCCIWomen) July 22, 2023
टी20 मालिका भारताच्या खिशात
तत्पूर्वी उभय संघात पार पडलेली 3 सामन्यांची टी20 मालिका भारताने आपल्या खिशात घातली होती. या मालिकेतील पहिले दोन सामने भारताने जिंकले होते. तसेच, तिसऱ्या सामन्यात बांगलादेशने विजय मिळवला होता. यावेळी त्यांनी व्हाईटवॉश टाळला होता, पण मालिकेवर पाणी सोडावे लागले होते.
तिसऱ्या वनडे सामन्यासाठी उभय संघाची प्लेइंग इलेव्हन
बांगलादेश महिला
शमीमा सुलताना, शोभना मोस्तारी, फरगाना हक, लता मोंडल, रितू मोनी, निगर सुलताना (यष्टीरक्षक/कर्णधार), राबेया खान, नाहिदा अक्टर, फहिमा खातून, सुलताना खातून आणि मारुफा अक्तर
भारतीय महिला
स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, स्नेह राणा, देविका वैद्य आणि मेघना सिंग. (ban w vs ind w 3rd odi Bangladesh Women opt to bat)
महत्त्वाच्या बातम्या-
आपला Record उद्ध्वस्त होताच सचिनकडून विराटचे कौतुक; म्हणाला, ‘आणखी एक दिवस…’
शतकानंतर विराटच्या वक्तव्याने जिंकले 140 कोटी भारतीयांचे मन; म्हणाला, ‘माझ्यासाठी रेकॉर्ड महत्त्वाचा नाही…’