नागपूरच्या घरच्या मैदानावर बेंगलुरू बुल्स आपला या मोसमातील तिसरा सामना खेळणार आहे. त्यांचा सामना हा या मोसमातील नवीन संघ असलेल्या यू पी योद्धाजच्या संघासोबत असणार आहे. दोन्ही संघानी मागील सामने जिंकेल आहेत, यामुळेच दोन्ही संघांचा आत्मविश्वास वाढला आहे.
बंगलोरू बुल्सने काल अजय ठाकूरच्या तामिळ थलाइवाला रोमहर्षक सामन्यात एका गुणाने हरवले होते. पहिल्या सत्रात बंगलोरचा संघ २३-८ ने पुढे होता पण त्यानंतर तामिळच्या संघाने रेडींग आणि डिफेन्स दोनीही डिपार्टमेंटमध्ये चांगला खेळ केला आणि सामना रोमहर्षक बनवला.
दुसऱ्या बाजूला यूपीने मागील सामन्यात एक सांघिक खेळ करून सामना जिंकला होता. रेडींगमध्ये कर्णधार आणि या मोसमातील सर्वात महागडा खेळाडू असलेला नितीन तोमर चांगला खेळ करत आहे, तर रिशांक देवाडीका ही त्याला चांगली साथ देत आहे. तसेच त्याच्याकडे स्टार अष्टपैलू खेळाडू राजेश नरवाल ही आहे.
संभाव्य संघ
बंगलोरू बुल्स
१ रोहितकुमार
२ अजयकुमार
३ गुरविंदर सिंग
४ अंकित सांगवान
५ रविंदर पहल
६ प्रितम चिल्लर
७ संजय श्रेष्ठ
यू पी योद्धाज
१ नितीन तोमर
२ रिशांक देवाडिगा
३ महेश गौड
४ जीवा कुमार
५ हाडी ताजीक
६ नितेश कुमार
७ राजेश नरवाल