T20 WC 2026: यंदाच्या टी-२० विश्वचषकातील सुपर ८ फेरीतील पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील सामना रोमांचक आणि निर्णायक ठरणार आहे. पाकिस्तानसाठी हा सामना ‘करो या मरो’ असा आहे. सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी विजय आवश्यक आहे, कारण पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. Super 8
इंग्लंडने आधीच श्रीलंकेला धावगतीने पराभूत केले आहे आणि उपांत्य फेरीच्या शर्यतीत आघाडीवर आहे. त्यामुळे आता हा सामना अधिक महत्त्वाचा असल्याने पाकिस्तानवर दबाव वाढला आहे. PAK VS ENG
आज २४ फेब्रुवारी रोजी श्रीलंकेतील पल्लेकेले मैदानावर संध्याकाळी ७ वाजता सामना सुरू होईल. हवामान विभागाच्या मते, आकाश निरभ्र असेल, पावसाची शक्यता फक्त ५ टक्के आहे. तापमान सुमारे ३४ अंश सेल्सिअस असेल आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता फक्त ६ टक्के आहे. त्यामुळे, सामना पूर्ण २० षटकांचा असेल.
जर पावसामुळे सामना रद्द झाला तर पाकिस्तानला एक गुण मिळेल, परंतु नेट रन रेट शून्य राहील. शेवटचा सामना जिंकण्यासाठी नेट रन रेटमध्ये सुधारणा करावी लागेल. दुसरीकडे, जर सामना रद्द झाला तर इंग्लंडला फायदा होईल, त्यांना तीन गुण मिळतील आणि उपांत्य फेरीतील स्थान जवळजवळ निश्चित होईल.
सुपर 8च्या सामन्यात इंग्लंड यजमान श्रीलंकेने हरवले आहे, इंग्लंडने श्रीलंकेविरुद्धचा सामना मोठ्या नेट रन रेटसह जिंकला ज्यामुळे सेमीफायनलनध्ये पोहोचण्याची शक्याता जास्त आहे. दुसरीकडे पाकिस्तान पहिला सुपर8 सामना न्यूझीलंडशी होणार पण पावसामुळे तो सामना रद्द करण्यात आला, दोन्ही संघांना 1-1 गुण वाटून देण्यात आले.





