पुणे: एसएनबीपी पुरस्कृत २८ व्या नेहरू अखिल भारतीय आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धेत बेंगलोर सिटी विद्यापीठ संघाने पारूल विद्यापीठ संघाचा १९-१ गोलने धुव्वा उडविला. दुसरीकडे चुरशीच्या झालेल्या संभलपूर विद्यापीठविरूध्द कुरूक्षेत्र विद्यापीठ यांच्यातील लढत बरोबरी संपली. व्हिबीएसपी विद्यापीठ, जौनपूर, गुरू नानक देव विद्यापीठ अमृतसर, बेंगलोर सिटी विद्यापीठ, बंगलुरू यांनी बाद फेरीतील आपली जागा निश्चित केली. आज झालेल्या चार लढतींमध्ये एकूण ३९ गोल केले गेले.
असोसिएशन ऑफ इंडियन युर्निर्व्हसिटीजच्या सहकार्याने व हॉकी इंडियाच्या मान्यतेने आणि एसएनबीपी ग्रुप ऑफ इस्टिट्युटच्या वतीने पिंपरी येथिल मेजर ध्यानचंद हॉकी पॉलीग्रास स्टेडियमच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत ब गटातील लढतील बेंगलोर सिटी विद्यापीठ संघाने पारूल विद्यापीठ वडोदरा संघाचा १९-१ गोलने धुव्वा उडविला. विजयी संघाकडून कुमार वसंत वाय गोकावीने १ ल्या, २३ व्या, ४७ व्या, ५४ व्या मिनिटाला असे ४, श्रीधर बीएनने ८ व्या व ११ व्या मिनिटाला दोन, मुटाघर हरेश एचएसने १३ व्या व ४५ व्या, ४९ व्या व ५३ व्या मिनिटाला चार, पवन एफएमने १५ व्या व ३७ व्या व ५९ व्या मिनिटाला तीन, गौडा प्रणाम वायएमने २१ व्या, २६ व्या,३६ व्या व ५२ व्या मिनिटाला असे चार तर यादव दिपक बीआरने २७ व्या मिनिटाला व पुनिथ आरने ३२ व्या मिनिटाला प्रत्येकी एक गोल केले. पराभूत संघाचा एकमेव गोल रूचित पटेलने ६ व्या मिनिटाला केला.
ब गटातील दुसरा संभलपूर विद्यापीठ विरूध्द कुरूक्षेत्र विद्यापीठ यांच्यातील लढती चुरशीची झाली. संभलपूरच्या कुंजूर नबीनने २९ व्या मिनिटाला पेनेल्टी कॉर्नरद्वारे गोल करून आपल्या संघाला आघाडी दिली. नंतर त्यांच्या नितेशने ३८ व्या मिनिटाला दुसरा गोल केला. पण नंतर कुरूक्षेत्र विद्यापीठ संघाच्या खेळाडूंनी नियोजनपूर्वक खेळ करण्यास सुरवात केली. ४६ व्या मिनिटाला कुरूक्षेत्र संघाला पेनेल्टी कॉर्नर मिळाला. त्याचा फायदा त्याच्या मोखरामने गोल करून घेतला. त्यानंतर ५९ व्या मिनिटाला त्यांच्या आग्यपालने संघासाठी दुसरा गोल करून बरोबरी साधली. ही बरोबरी शेवट पर्यंत राहिली.
अ गटातील लढतीत गुरू नानक देव विद्यापीठ, अमृतसर संघाने आपला विजयी धडाका कायम राखत मनोन्मन्यम सुंदरनार विद्यापीठ, तिरूनलवेली संघाला ५-२ गोलने नमविले. गुरू नानक देव विद्यापीठ संघाकडून राहूलने १३ व्या मि., गौतम कुमारने ११ व्या व रंजोत सिंगने ४८ व्या मिनिटाला प्रत्येकी एक गोल केला. त्यांच्या सुदर्शन सिंगने ५७ व्या व ६० व्या मिनिटाला असे दोन गोल केले.
मनोन्मन्यम सुंदरनार विद्यापीठ, तिरूनलवेली संघाकडून दिनेश कुमारने ४० व्या मिनिटाला संघाचा पहिला गोल पेनेल्टी कॉर्नरद्वारे केला. दिनेश कुमारनेच पुन्हा ५३ व्या मिनिटाला संघाचा दुसरा गोल केला.
अ गटातील सामन्यात व्हिबीएसपी विद्यापीठ, जौनपूर संघाने एलएनआयपीई, ग्वालिअर संघाचा ५-३ गोलने पराभव केला. विजयी संघाकडून विजेंद्र सिंगने १४ व्या, ५५ व्या व ५६ व्या मिनिटाला असे तीन गोल केले. त्यांच्या उत्तम सिंगने २२ व्या आणि अमित यादवने ४२ व्या मिनिटाला पेनेल्टी कॉर्नरद्वारे गोल केले.
पराभूत एलएनआयपीई, ग्वालिअर संघाकडून यश बाथमने २४ व्या मिनिटाला संघाचा पहिला गोल केला. त्यानंतर अमित सिंगने आपल्या संघाला २९ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनेल्ट कॉर्नरद्वारे गोल केला. नंतर त्यांच्या विकास जोशीने ४३ व्या मिनिटाला गोल केला.
निकाल:
गट अ: गुरूनानक देव विद्यापीठ, अमृतसर ५ गोल (राहूल १३ व्या मि., गौतम कुमार ११ व्या मि., रंजोत सिंग १७ व्या मि., सुदर्शन सिंग ५७ व्या व ६० व्या मि.) वि. वि. मनोन्मन्यम सुंदरनार विद्यापीठ, तिरूनलवेली २ गोल (दिनेश कुमार ४० व्या व ५३ व्या मि.)
गट अ: व्हिबीएसपी विद्यापीठ, जौनपूर ५ गोल (विजेंद्र सिंग १४ व्या, ५५ व्या व ५६ व्या
मि., उत्तम सिंग २२ व्या मि., अमित यादव ४२ व्या मि.) वि. वि. एलएनआयपीई, ग्वालिअर ३
गोल (यश बाथम २४ व्या मि., अमित सिंग २९ व्या मि., विकास जोशी ४३ व्या मि.)
गट ब: बेंगलोर सिटी विद्यापीठ, बंगलुरू: १९ गोल ( कुमार वसंथा वाय गोकावी १ ल्या, २३
व्या, ४७ व्या, ५४ व्या मि., श्रीधर बीएन ८ व्या व ११ व्या मि., मुटाघर हरेश एचएस १३ व्या व
४५ व्या, ४९ व्या व ५३ व्या मि., पवन एफएम १५ व्या व ३७ व्या व ५९ व्या मि.,गौडा प्रणाम
वायएम २१ व्या, २६ व्या,३६ व्या व ५२ व्या मि., यादव दिपक बीआर २७ व्या मि., पुनिथ
आर ३२ व्या मि.) वि. वि. पारूल विद्यापीठ, वडोदरा:१ गोल (रूचित पटेल ६ व्या मि.).
गट ब: संभलपूर विद्यापीठ, संभलपूर: २ गोल (कुंजूर नबीन २९ व मि., नितेश ३८
व्या मि.) बरोबरी वि. कुरूक्षेत्र विद्यापीठ, कुरूक्षेत्र: २ गोल (मोखराम ४६ व्या मि., आग्यपाल ५९ व्या मि.)
महत्त्वाच्या बातम्या-
पंजाबकडून पुणे विद्यापीठाला पराभवाचा धक्का; लव्हली विद्यापीठाकडून मुंबई विद्यापीठ पराभूत