आयपीएल 2025 चा 28 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जात आहे. राजस्थानच्या होम ग्राउंडवर 18 व्या हंगामातील हा पहिलाच सामना आहे. बेंगळुरूने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता व राजस्थानला फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 173 धावा केल्या व बंगळुरूला 174 धावांचे आव्हान दिले आहे.
प्रथम फलंदाजी करताना राजस्थानसाठी यशस्वी जयस्वालने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 47 चेंडूत 75 धावा केल्या. त्याचबरोबर जयस्वालने 10 चौकार व 2 षटकार देखील झळकावले आहेत. कर्णधार संजू सॅमसन काही खास कामगिरी करू शकला नाही. त्याने केवळ 15 धावांची पारी खेळली.
बंगळुरूसाठी यश दयाल, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, कृणाल पांड्या यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. आता बंगळुरू समोर आलेले 174 धावांचे आव्हान ते पूर्ण करू शकतील का नाही हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.