भारताचा एक संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेला असून इंडिया ए संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात इंडिया ए विरुद्ध बांगलादेश ए यांच्यात दोन अनाधिकृत चार दिवसीय कसोटी सामने खेळले जाणार आहेत. यातील पहिला सामना मंगळवारपासून (29 नोव्हेंबर)शेख कमल इंटरनॅशनल स्टेडियमध्ये येथे खेळला जात आहे. यामध्ये भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी रविंद्र जडेजा याची जागा घेणाऱ्या सौरभ कुमार याने प्रभावी कामगिरी केली आहे.
दौऱ्यातील पहिल्याच अनाधिकृत कसोटी सामन्यात सौरभने प्रभावी गोलंदाजी केली. त्याने 8 षटकांत 23 धावा देताना 4 विकेट्स घेतल्या. यामधील 3 षटके निर्धाव होती. तसेच मोसाद्देक हुसेन याची विकेट त्याने घेतली जी महत्वाची ठरली. कारण त्याने एकट्याने 88 चेंडूत 63 धावा केल्या.
सौरभला मुकेश कुमार (Mukesh Kumar) आणि नवदीप सैनी यांचीही चांगली साथ मिळाली. मुकेशने 12 षटकात 25 धावा देत 2 विकेट्स घेतल्या, तर सैनीने 10 षटकात 21 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. अतित शेठनेही एक विकेट घेतली. भारतीय गोलंदाजांच्या या कामगिरीमुळे बांगलादेश ए चा पहिला डाव 45 षटकात 112 धावसंख्येवरच आटोपला
सौरभ कुमार (Saurabh Kumar) हा उत्तर प्रदेशचा असून तो डाव्या हाताचा फिरकीपटू आहे. बांगलादेशच्या दौऱ्यासाठी भारताचा संघ जाहीर झाला असून त्यामध्ये रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याला संघात घेतले होते, पण तो दुखापतीमुळे बाहेर झाल्याने त्याच्याजागी संघात सौरभची वर्णी लागणार, अशा रिपोर्ट्स समोर येत आहे. त्याने प्रथम श्रेणीमध्ये सतरा वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने 52 प्रथम श्रेणी सामन्यात एकूण 222 विकेट्स घेतल्या आहेत.
या दौऱ्यात खेळल्या जाणाऱ्या दोन्ही अनाधिकृत चार दिवसीय कसोटी सामन्यात अभिमन्यू ईश्वरन नेतृत्व करणार आहे. या दोन्ही सामन्यात सौरभला निवडले आहे. Bangladesh A vs India A Saurabh Kumar takes four wickets in first innings
बांगलादेश विरुद्ध पहिल्या सामन्यासाठी भारत अ संघ
अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), रोहन कुन्नुमल, यशस्वी जयस्वाल, यश धुल, सरफराझ खान, तिलक वर्मा, उपेंद्र यादव (विकेटकीपर), सौरभ कुमार, राहुल चाहर, जयंत यादव, मुकेश कुमार, नवदीप सैनी आणि अतित सेठ.
बांगलादेेश विरुद्ध दुसऱ्या सामन्यासाठी भारत अ संघ
अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), रोहन कुन्नुमल, चेतेश्वर पुजारा, यशस्वी जयस्वाल, यश धुल, सरफराझ खान, तिलक वर्मा, उपेंद्र यादव (यष्टीरक्षक), सौरभ कुमार, राहुल चाहर, जयंत यादव, मुकेश कुमार, नवदीप सैनी, अतित सेठ,उमेश यादव आणि केएस भरत (विकेटकीपर)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अरे, हे काय बोलून गेला इंग्लंडचा कोच! मॅक्युलम म्हणाला, ‘पाकिस्तानविरुद्ध हरलो तरी चालेल…’
विराट कोहली विरुद्ध तू असा सामना झाला तर कोण जिंकेल? सूर्या म्हणाला, ‘अर्थातच…’