इंग्लंड पुरूष क्रिकेट संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. इंग्लंड खूप मोठ्या कालावधीनंतर पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका खेळणार आहे. यातील पहिला सामना एक डिसेंबरला खेळला जाणार आहे. या ऐतिहासिक मालिकेआधी इंग्लंडचा मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम याने आश्चर्यकारक विधान केले आहे.
ब्रेंडन मॅक्युलम (Brendon McCullum) म्हणाला, “इंग्लंड सामने हरला तरी चालेल मात्र मालिका रोमांचक व्हायला हवी. मग पाकिस्तान जिंको वा इंग्लंड काही फरक पडत नाही.”
या मालिकेतील पहिला सामना रावळपिंडी येथे खेळला जाणार आहे. दुसरा सामना मुल्तान येथे 9 डिसेंबर ते 13 डिसेंबर दरम्यान खेळला जाणार आहे, तर तिसरा सामना 17 डिसेंबरला ते 21 डिसेंबरमध्ये कराची येथे खेळला जाणार आहे.
या दौऱ्यासाठी इंग्लंडचे नेतृत्व बेन स्टोक्स (Ben Stokes) करत असून संघामध्ये जेम्स ऍंडरसन, जॉनी बेयरस्टो सारखे खेळाडू आहेत. या दौऱ्यात मॅक्युलमला जिंकण्याच्या पूर्ण आशा आहेत, मात्र पाकिस्तानने त्यांना हरवले तर काही हरकत नाही. त्याने म्हटले, “या मालिकेत निकाल नाही तर प्रेक्षकांना किती आनंद मिळतो हे महत्वाचे आहे. आम्ही पराभूत झालो तर निश्चितच पाकिस्तानने उत्तम खेळ केला असेल. ही मालिका रोमांचक झाली अशी चर्चा व्हायला हवी. जगात कुठेही कसोटी सामने होऊ द्या स्टेडियम पूर्णपणे भरलेले हवे अशी अपेक्षा असते.”
मॅक्युलमचे हे विधान आश्चर्यकारक वाटले असले तरी त्यामागे एक कारण आहे. नुकतेच इंग्लंडने टी20 विश्वचषक जिंकला आणि संघ वनडे मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात थांबले. तीन सामन्यांच्या या वनडे मालिकेतील पहिलाच सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (एमसीजी) (Melbourne Cricket Ground) खेळला गेला, ज्यासाठी मोजक्याच प्रेक्षकांनी हजेरी लावली होती.
https://twitter.com/_CricStats_/status/1595481094727651329?s=20&t=AA8uVSGPl5CsgWAUcYdXwQ
एमसीजीवर टी20 विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळला गेला. त्या सामन्यात स्टेडियम पूर्णपणे खचाखच भरले होते. त्या सामन्यातील फोटो आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड मालिकेतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अशी स्थिती दिसल्याने मॅक्युलमने तसे वक्तव्य केले असावे. Brendon McCullum statement bout PAKvENG Test Series
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट कोहली विरुद्ध तू असा सामना झाला तर कोण जिंकेल? सूर्या म्हणाला, ‘अर्थातच…’
आता बास झालं! न्यूझीलंडच्या दिग्गजाने देखील म्हटले, पंतला नाहीतर ‘या’ खेळाडूला द्या संधी






