---Advertisement---

BREAKING। भारताशी दोन हात करायला बांग्लादेशचा संघ जाहिर! अनपेक्षित खेळाडूकडे कर्णधारपदाची धुरा

On: शनिवार, ऑगस्ट 13, 2022 6:17 PM
bangladesh
---Advertisement---

बांगलादेशने (BCB) अखेर आशिया कप २०२२साठी आपला संघ जाहीर केला आहे. आशिया चषक, न्यूझीलंडमधील तिरंगी मालिका आणि टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी शाकिब अल हसनची बांगलादेश क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. शाकिब अल हसनची २०२२ पर्यंत बांगलादेश टी-२० संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियात होणार्‍या आयसीसी पुरुषांच्या टी-२० विश्वचषकात देखील शाकिब बांगलादेशचे नेतृत्व करेल.

बीसीबी क्रिकेट ऑपरेशन्सचे अध्यक्ष जलाल युनूस यांनी एका बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले की, “आगामी आयसीसी टी-२० विश्वचषकापर्यंत शाकिब अल हसन कर्णधार असेल. त्याने चूक केल्याचे कबूल केले (बेटविनर न्यूजसह करारावर स्वाक्षरी करणे) आणि त्याने सांगितले की यापुढे चुका होणार नाहीत आणि आम्ही त्याबाबत आशावादी आहोत.”

विशेष म्हणजे अनेक दिवसांपासून क्रिकेटमधील अयोग्य वर्तवणूकीमुळे शाकिब अल हसन वादात सापडला होता. त्याशिवाय अनेकांनी त्याला ट्रोल देखील केले होते. तरीसुद्धा बांग्लादेश संघाच्या कर्णधारपदाची धुरा शाकिबच्या हाती दिल्याने सर्वांना धक्का बसला आहे. शिव्या अनेकांनी आता बांग्लादेश क्रिकेट बोर्डाला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

आशिया चषक स्पर्धेसाठी बांगलादेश संघ:
शकीब अल हसन (कर्णधार), अनामुल हक, मुशफिकुर रहीम, अफिफ हुसैन, मोसाद्देक हुसेन, महमुदुल्ला, महेदी हसन, मोहम्मद सैफुद्दीन, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, नसुम अहमद, सब्बीर रहमान, मेहदी हसन मिराज. इबादोत हुसेन, परवेझ हुसेन इमॉन, नूरुल हसन सोहन, तस्किन अहमद

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

राशिदच्या खेळाला‌ कोणाची लागली नजर? सध्याचा फॉर्म पाहून वाटेल हळहळ

‘आमच्या खेळाडूंना आयपीएलमुळेच बाकीच्या टी२० लीगमध्ये नो एंट्री’, पाकिस्तानच्या दिग्गजाचा आरोप

पाकिस्तानी खेळाडूही देऊ लागले विराटला सल्ले; हा दिग्गज म्हणतोय, “त्याला स्वतःला…”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---