---Advertisement---

फ्लॉवर नहीं, फायर हैं! बांगलादेशच्या पठ्ठ्याने आयर्लंडविरुद्ध रचला इतिहास, संघाचा 7 विकेट्सने विजय

Mushfiqur-Rahim
---Advertisement---

आयर्लंड संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात 3 वनडे, 3 टी20 आणि एक कसोटी सामना खेळण्यात आला. कसोटी सामना 4 ते 7 एप्रिल दरम्यान पार पडला. या सामन्यात बांगलादेशचा 7 विकेट्सने विजय झाला. या सामन्यात बांगलादेशला विजयासाठी चौथ्या डावात 138 धावांचे आव्हान मिळाले होते. हे आव्हान बांगलादेशने 3 विकेट्स गमावत पूर्ण केले. पहिल्या डावात शतक ठोकणाऱ्या मुशफिकुर रहीम याने दुसऱ्या डावातही नाबाद 51 धावांची खेळी साकारली. या शानदार प्रदर्शनासाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. खरं तर, आयर्लंड संघाने दुसऱ्या डावात लॉर्कन टुकर 108, हॅरी टेक्टर 56 आणि एंडी मॅक्ब्रीन याच्या 72 धावांच्या मदतीने 292 धावा केल्या होत्या.

बांगलादेशने घेतलेली 155 धावांची आघाडी
बांगलादेश संघाने मुशफिकुर रहीम (Mushfiqur Rahim) याच्या 126 धावांच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर पहिल्याडावात 369 धावा केल्या होत्या. यात कर्णधार शाकिब अल हसन याच्या 87 आणि मेहिदी हसन याच्या 55 धावांचाही समावेश होता. या तीन फलंदाजांव्यतिरिक्त लिटन दास याला 43 धावा करता आल्या होत्या. त्याच्याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला खास कामगिरी करता आली नाही. त्यामुळे बांगलादेशला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मात्र, 369 धावा करत बांगलादेशने आयर्लंडवर 155 धावांची आघाडी घेतली होती.

आयर्लंड 214 धावांवर सर्वबाद
कसोटी क्रिकेट हा प्रकार आयर्लंडसाठी नवीन आहे. हे त्यांच्या खेळातून दिसत आहे. नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करणाऱ्या आयर्लंड संघाचा पहिला डाव अवघ्या 214 धावांवर संपुष्टात आला होता. आयर्लंडसाठी हॅरी टेक्टर याने 50 धावांची खेळी केली होती. त्याच्याव्यतिरिक्त लॉर्कन टुकरने 37, कर्टिस कँफरने 34 आणि मार्क एडेरने 32 धावा केल्या होत्या. दुसरीकडे, बांगलादेशसाठी तैजुल इस्लाम याने 5 विकेट्स घेतल्या होत्या.

मुशफिकुरचा विक्रम
बांगलादेशचा अनुभवी कसोटी खेळाडू मुशफिकुर रहीम याने आयर्लंविरुद्ध कसोटी शतक ठोकत इतिहास रचला आहे. त्याने ढाका येथे खेळल्या जात असलेल्या कसोटीच्या पहिल्या डावात 135 चेंडूत शतक ठोकले आणि 126 धावांवर बाद झाला. या शतकामुळे तो आयर्लंडविरुद्ध पहिले कसोटी शतक ठोकणारा पहिला खेळाडू बनला आहे.

सलग चौथ्या कसोटीत पराभव
आयर्लंडला कसोटी क्रिकेट खेळणारा देश म्हणून मान्यता मिळाल्यानंतर हा त्यांचा चौथा कसोटा होता. आतापर्यंत खेळण्यात आलेल्या सर्व 4 कसोटी सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. 2018मध्ये पाकिस्तानविरुद्ध त्यांनी पहिला कसोटी सामना 5 विकेट्सने गमावला होता. तसेच, 2019मध्ये अफगाणिस्तानविरुद्धचा दुसरा कसोटी सामना 7 विकेट्सने गमावला होता, तर 2019मध्ये इंग्लंडने त्यांना 143 धावांनी धूळ चारली होती. आता बांगलादेशकडूनही त्यांना 7 विकेट्सने पराभूत व्हावे लागले आहे. (bangladesh beat ireland by 7 wickets cricketer mushfiqur rahim won player of the match read here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सपेक्षाही जास्त ‘ही’ टीम उधळते चीअरलीडर्सवर पैसा, दुसऱ्या स्थानावर RCB
डेथ ओव्हर्समध्ये ‘हा’ चेंडू गोलंदाजांचे सर्वात मोठे हत्यार, प्रशिक्षक ब्रावोची मोठी प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---