---Advertisement---

शाकिब काय सुधारणार नाही! लाईव्ह सामन्यात रागारागात बॅट घेऊन अंपायरकडे धावला

On: रविवार, जानेवारी 8, 2023 12:13 PM
Shakib Al Hasan
---Advertisement---

बांगलादेशचा स्टार अष्टपैलू शाकिब अल हसन (Shakib Al Hasan)हा सध्या क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. खेळामध्ये तो चांगला आहे, मात्र अनेकदा त्याला मैदानात संतुलन गमावताना पाहिले आहे. मागील वर्षीच पंचाशी वाद घातल्याने त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टिका झाली होती. आता पुन्हा त्याने तिच चुक केली आहे. बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये (बीपीएल) तो पंचावर चिढला. या प्रकाराचा व्हिडिओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

शेर ए बांगला स्टेडियमवर सुरु असलेल्या सामन्यात फॉर्च्यून बरीशालच्या डावादरम्यान शाकिब फलंदाजी करत होता. तेव्हा 16व्या षटकात एक चेंडू त्याच्या डोक्यावरुन गेला. याला पंचांनी वाईड दिले नाही आणि शाकिब रागारागात बॅट घेऊन त्यांच्याकडे गेला. त्याने पंचाशी वाद घालायला सुरूवात केली.

वाद एवढा वाढला की विरोधी संघाचा विकेटकीपर मुशफिकुर रहीम याला मध्ये पडावे लागले. त्याने शाकिबला शांत होण्यास सांगितले. यानंतर शाकिबने पुढच्याच चेंडूत षटकार मारला. त्याने 26 चेंडूतच अर्धशतक पूर्ण केले.

या सामन्यात शाकिबने 32 चेंडूत 67 धावा केल्या. ज्यामध्ये त्याने 7 चौकार आणि 4 षटकार मारले. शाकिबने 2021मध्ये ढाका प्रीमियार लीगमध्ये एका सामन्यादरम्यान पंचांच्या निर्णयाने नाराज होत स्टम्पला पाय मारला होता. त्याने स्टम्प काढून फेकला होता. तेव्हा त्याने या  प्रकरणानंतर फेसबुकमार्फत माफिही मागितली होती.

काही दिवसांपूर्वीच शाकिबने बीपीएलच्या नुकसानाबाबत व्यक्त होताना म्हटले, “जर त्यांनी मला सीईओ (मुख्य कार्यकारी अध्यक्ष) बनवले तर मी एक-दोन महिन्यातच सर्वकाही ठिक करेल. तुम्ही नायक चित्रपट पाहिला असेलच. जर तुम्हाला काही करायचे असते तर तुम्ही ते एका दिवसातही पूर्ण करता.”

“मी खेळाडूंचा लिलाव वेळेवर करेल. जेव्हा आंतरराष्ट्रीय सामने नसतील तेव्हा ही लीग ठेवेल. आपल्याकडे आधुनिक सोई-सुविधा, टेक्नॉलॉजी आहेत”, असेही शाकिबने पुढे म्हटले.

बीपीएल या बांगलादेशच्या स्थानिक टी20 लीगची सुरुवात 2012मध्ये झाली. तेव्हा सहा फ्रॅंचायजी होते आता त्यामध्ये आणखी एकाची भर पडली आहे. (Shakib Al Hasan furious over umpire wide ball decision BPL )

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भावनेच्या भरात चहलकडून हद्दच पार! थेट सूर्यासोबत केले असे काही, डिलीट व्हायच्या आत पाहा व्हिडिओ
VIDEO: ‘लहानपणी तरी माझी फलंदाजी पाहिली…’, प्रशिक्षक द्रविडच्या प्रश्नावर सूर्याचे दिलखुलास उत्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---