आयसीसी वनडे विश्वचषक 2023चे सराव सामने शुक्रवारी (29 सप्टेंबर) सुरू झाले. पहिल्या दिवशी तीन सराव सामने आयोजित केले गेले. त्यात सर्वात पहिला निकाल लागला, तो श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामन्याचा. गुवाहाटीमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात बांगलादेशने 7 विकेट्स राखून विजय मिळवला. बांगालदेशसाठी त्यांच्या वरच्या फळीतील तिन्ही फलंदाजांनी अर्धशतकी खेळी करून संघाला विजय मिळवून दिला.
श्रीलंकेने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. श्रालंका संघ 49.1 षटकात 263 धावा करून सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात बांगलादेशने हे लक्ष्य 3 विकेट्स गमावून 42 षटकांमध्ये गाठले. बांगलादेशसाठी मेहदी हसन याने 9 षटकात 36 धावा खर्च करून सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर फलंदाजांमध्ये सर्वोत्तम प्रदर्शन सलामीवीर संझीद हसन याने केले. सलामीवीर लिटन दास याने 61, तर मेहदी हसन मिराझ याने 67* धावांची महत्वपूर्ण खेळी केली. मुशफिकूर रहीम यानेही 35* धावांचे योगदान दिले.
तत्पूर्वी श्रालंकन संघासाठी फलंदाजांमध्ये सलामीवीर मथून निसांका याने 64 चेंडूत सर्वाधिक 68 धावांची खेळी केली. कुसल परेला याने 34, तर कुसल मेंडिस 22 धावा करून बाद झाला. थनंजया डी सिल्वा याने 55 धावांची महत्वाची खेळी केली. पथून निसांका आणि आणि थनंजया डी सिल्वा यांच्याव्यतिरिक्त एकही श्रीलंकन फलंदाज अर्धशतक करू शकला नाही. बांगलादेशसाठी मेहदी सहनच्या साथीने मेहदी हसन मिराझ, नंझीम हसन शाकिब, शोरफूल इस्लाम आणि नसिम अहमद यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. श्रीलंकन गोलंदाजांमध्ये लाहिरू कुमार, दुनिथ वेल्लालागे आणि सुशन हेमंथा यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. मात्र आपल्या संघाला विजय मात्र मिळवून देऊ शकले नाहीत.
विश्वचषकाची सुरुवात 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्याआधी श्रीलंका आणि बांगलादेश यांना प्रत्येकी एक-एक सराव सामना खेळायचा आहे. श्रीलंका आपला पुढचा सराव सामना 3 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानसोबत खेळेल. तर दुसरीकडे बंगालदेश आपला दुसरा सराव सामना 2 ऑक्टोबर रोजी इंग्लंडसोबत खेळेल. (Bangladesh beat Sri Lanka by 7 wickets in World Cup practice match)
महत्वाच्या बातम्या –
स्टुअर्ट ब्रॉडच्या सन्मानार्थ मोठा निर्णय, ज्या स्टेडियमवर क्रिकेटशी प्रेम झालं, तिथेच लावली आपल्या नावाची पाटी
मोहम्मद रिझवानकडून विश्वचषकाचा शुभारंभ! पहिल्याच सराव सामन्यात शतक ठोकत दाखवून दिला फॉर्म