---Advertisement---

बांगलादेशने सांघिक कामगिरीच्या जोरावर श्रीलंकेचा ३३ धावांनी पहिल्या वनडेत उडवला धुव्वा

---Advertisement---

बांगलादेश आणि श्रीलंके दरम्यान 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना रविवारी (23 मे) पार पडला आहे. या पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेला 33 धावांनी पराभूत करून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करत असलेल्या बांगलादेशने 6 गडी गमावत 257 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेचा संघ केवळ 224 धावाच करू शकला.

बांगलादेशचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय फारसा योग्य ठरला नाही. कारण त्यांचा सलामीवीर फलंदाज लिटन दास खातेही न उघडता तंबूत परतला. यानंतर मात्र अनुभवी फलंदाज शाकिब उल हसन आणि कर्णधार तमिम इकबाल यांनी दुसऱ्या बळीसाठी थोडासा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र शाकिब देखील 15 धावा करून बाद झाला.

परंतु, तमिम इकबालने दुसर्‍या बाजूने आपली शानदार फलंदाजी सुरूच ठेवली. तमिम आता मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत असताना तो 52 धावा करून बाद झाला, व बांगलादेशची अवस्था 4 बाद 99 झाली होती. या अवघड परिस्थितीतून बांगलादेशला मुशफिकुर रहीम आणि महमूदुल्लाहने सोडवले. दोघांनी पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत संघाला अडचणीतून बाहेर काढले. रहीमने 84 आणि महमुदुल्लाने 54 धावा केल्या व बांगलादेशने निर्धारित 50 षटकात 6 गडी गमावत 257 धावांपर्यंत मजल मारली. श्रीलंकेकडून धनंजय डी सिल्वाने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.

प्रत्युत्तरात, श्रीलंकेच्या संघाने सलामीवीर धनुष्का गुणथिलाका व नंतर पथम निसानका यांच्या विकेट झटपट गमावल्या. ही पडझड रोखण्यात इतर फलंदाजांनाही फारसे यश आले नाही व कुसल मेंडिस, कुसल परेरा, धनंजय डी सिल्वा विशेष काही न करता तंबूत परतले. एकवेळ श्रीलंकाची परिस्थिती 6 बाद 102 झाली होती.

येथून श्रीलंकेचा संघ मोठ्या फरकाने पराभूत होईल असे वाटत होते, पण संघासाठी वनिंदू हसरंगाने शानदार कामगिरी करत संघाला विजयाच्या जवळ नेण्याचा प्रयत्न केला. त्याने 60 चेंडूंत आक्रमक 74 धावा फटकावल्या परंतु, इतर फलंदाजांची योग्य साथ न मिळाल्यामुळे श्रीलंकेचा संघ 224 धावांवर बाद झाला आणि बांगलादेशने 33 धावांनी सहज विजय मिळविला. बांगलादेशकडून मेहदी हसनने 4 आणि मुस्तफिजुर रहमानने 3 गडी बाद केले.

महत्त्वाच्या बातम्या – 

आयपीएलमध्ये खेळणार का? पाकिस्तानच्या मोहम्मद आमीरने दिले ‘हे’ उत्तर 

बंदीसाठी बाबा अन् मी जबाबदार! पृथ्वी शॉने कारकिर्दीतील कठीण काळाबाबत दिली मोठी प्रतिक्रिया

कट्टर फुटबॉलप्रेमी असलेल्या ‘या’ शहरात आता उभारले जाणार क्रिकेट स्टेडियम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---