---Advertisement---

दुसऱ्या वन डे सामन्यात वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवत बांगलादेशची मालिकेत विजयी आघाडी

On: शुक्रवार, जानेवारी 22, 2021 11:29 PM
---Advertisement---

बांगलादेश आणि वेस्ट इंडिज दरम्यान सुरू असलेल्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने वेस्ट इंडिजचा पराभव करत मालिका आपल्या नावे केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या या सामन्यात मेहंदी हसनच्या भेदक गोलंदाजी समोर वेस्ट इंडिजची फलंदाजी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली.

ढाकाच्या शेर ए बांगला स्टेडियममध्ये पार पडलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्टइंडीजचा पहिला डाव मेहंदी हसनच्या गोलंदाजीसमोर केवळ 148 धावांवर आटोपला. 149 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशकडून कर्णधार तमिम इक्बालने शानदार अर्धशतक झळकावत तब्बल 100 चेंडू राखून बांगलादेशला सहज विजय मिळवून दिला.

आपल्या शानदार गोलंदाजीसाठी मेहंदी हसनला सामनावीराचा पुरस्कार घोषित करण्यात आला. हसनने 9.4 षटकात केवळ 25 धावा देत 4 फलंदाजांना बाद केले. दोन्ही संघांमधील मालिकेचा शेवटचा सामना येत्या 25 जानेवारी रोजी खेळला जाणार आहे.

दरम्यान हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, वेस्टइंडीजच्या जवळ जवळ सर्वच प्रमुख खेळाडूंनी या मालिकेतून माघार घेतलेली होती. त्यामुळे वेस्टइंडीज क्रिकेट बोर्डाने या मालिकेत युवा खेळाडूंना संधी दिली . मात्र युवा खेळाडूंच्या या निराशाजनक कामगिरीमुळे वेस्टइंडीज क्रिकेटवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

ठरलं! आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचा लिलाव ‘या’ तारखेला होणार 

कोणतेही सत्य न तपासता कसे काय आरोप करतो? चाहत्यांच्या रोषानंतर हरभजन सिंगला मागावी लागली माफी

मुंबई लोकलमध्ये जागा मिळवणे कठीण की ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांचा सामना करणे? शार्दुलने दिले ‘हे’ उत्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---