---Advertisement---

नेपाळच्या कर्णधाराशी धक्काबुक्की भोवली, बांगलादेशच्या खेळाडूवर आयसीसीची कठोर कारवाई

On: बुधवार, जून 19, 2024 11:09 AM
---Advertisement---

बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तंझीम हसन शकीब याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) कठोर शिक्षा ठोठावली आहे. टी20 विश्वचषक 2024 दरम्यान आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी शकिबला त्याच्या मॅच फीच्या 15 टक्के दंड ठोठावण्यात आला.

रविवारी (16 जून) नेपाळ विरुद्ध बांगलादेश सामन्यात डावाच्या तिसऱ्या षटकात तंझीम हसन आणि नेपाळचा कर्णधार रोहित पौडेल यांच्यात धक्काबुक्की झाली होती. दोघांमध्ये बाचाबाची झाली होती. व्हिडिओ पाहिल्यानंतर स्पष्ट होतं की, दोघंही एकमेकांशी भांडणार होते. मात्र इतर खेळाडूंनी मध्यस्थी केल्यानं परिस्थिती निवळली.

तंझीमनं या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करत 7 धावांत 4 बळी घेतले. त्याच्या या शानदार स्पेलमुळे बांगलादेशनं 21 धावांनी सामना जिंकला. तंझीमनं आयसीसी आचारसंहितेच्या अनुच्छेद 2.12 चं उल्लंघन केल्याचं आढळून आलं आहे. त्याचा गुन्हा खेळाडू, सहाय्यक कर्मचारी, पंच, सामनाधिकारी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीशी (आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान प्रेक्षकासह) अयोग्य शारीरिक संपर्काशी संबंधित आहे.

मैदानावरील पंच अहसान रझा आणि सॅम नोगाज्स्की, तिसरे पंच जयरामन मदनगोपाल आणि चौथे पंच कुमार धर्मसेना यांनी त्याच्यावर हे आरोप केले आहेत. तंझीमनं आपला गुन्हा कबूल केला असून त्यानं आयसीसी एलिट पॅनेलचे सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांनी दिलेली शिक्षा स्वीकारली.

या सामन्यात बांगलादेशनं नेपाळवर विजय मिळवत स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये आपलं स्थान निश्चित केलं. बांगलादेशचा पुढील सामना गुरुवारी अँटिग्वा येथे ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. यानंतर त्यांना 22 जून रोजी भारताविरुद्ध सामना खेळायचा आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“हरिस, तू खंबीर राहा…आम्ही सर्व तुझ्या सोबत आहोत”; व्हायरल व्हिडिओवर शाहीन आफ्रिदीची प्रतिक्रिया
श्रेयस अय्यरचा होणार टीम इंडियात कमबॅक! रियान पराग, अभिषेक शर्मालाही मिळू शकते संधी
मोठी बातमी! केन विल्यमसननं न्यूझीलंडचं कर्णधारपद सोडलं, केंद्रीय करारही नाकारला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---