बांगलादेश दौऱ्यावर भारतीय संघाने 3 सामन्यांची वनडे मालिका 1-2 ने गमावली. यानंतर उभय संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेचा घाट घातला गेलाय. यातील पहिला कसोटी सामना 14 ते 18 डिसेंबर दरम्यान खेळला जात आहे. भारताने या सामन्यात आपले वर्चस्व गाजवले आहे. खरं तर, पहिल्या आणि दुसऱ्या डावात दमदार फलंदाजी करत भारताने बांगलादेशपुढे 513 आव्हान ठेवले आहे. बांगलादेश संघ या आव्हानापासून 241 धावा दूर आहे. तसेच, भारतीय संघाला 4 विकेट्सची आवश्यकता आहे. खरं तर, भारताने हा सामना चौथ्या दिवशीच जिंकला असता, पण एका चुकीमुळे बांगलादेशच्या कर्णधाराला जीवदान मिळाले.
खेळाडूंनी केली नाही अपील
सामन्याच्या चौथ्या दिवशी बांगलादेश संघाच्या फलंदाजांनी टिकून फलंदाजी केली. भारतीय गोलंदाजांनी पूर्ण जोर लावला, परंतु संपूर्ण दिवसात 6 फलंदाजांनाच तंबूत धाडता आले. दिवसाच्या पहिल्या सत्रात एकही बांगलादेशी फलंदाज बाद झाला नाही. या सामन्यात कर्णधार लिटन दास (Litton Das) याला भारतीय संघाच्या चुकीमुळे जीवदान मिळाले. दुसऱ्या सत्रात भारतीय संघाने दोन विकेट्स घेत पुनरागमन केले होते. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला लिटन क्रीझवर होता. 53व्या षटकाच्या 5व्या चेंडूवर त्याच्या बॅटची कड घेत यष्टीरक्षकाकडे गेला. गोलंदाज आणि यष्टीरक्षकासोबत कोणत्याही भारतीय खेळाडूने अपील केली नाही. एजमध्ये स्पष्ट दिसले की, चेंडू फलंदाजाच्या बॅटवर लागला आहे.
#IndvBan Whats happening here? Litton das had clearly edged the ball but none of the players appealed.. Umesh Yadav the bowler.. Pant had taken the catch… pic.twitter.com/9Kbo5gB7HR
— Anurag Sinha (@anuragsinha1992) December 17, 2022
लिटन दासने खेळले 59 चेंडू
भारतीय संघाच्या या चुकीनंतर लिटन दासने 54 चेंडू खेळून काढले. त्याने एकूण 59 चेंडूंवर 19 धावांची खेळी करत कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याच्या गोलंदाजीवर तंबूचा रस्ता पकडला. भारतीय संघाने त्यावेळी लिटनची विकेट घेतली असती, तर सामना चौथ्या दिवशीच संपुष्टात आला असता. कारण, सलग 3 विकेट्स पडल्यानंतर बांगलादेशच्या फलंदाजांवरील दबाव वाढला असता. तसेच, गोलंदाजांनी इतर फलंदाजांना बाद करण्याचा प्रयत्न केला असता.
झाकिर हसनने ठोकले शतक
बांगलादेशच्या दुसऱ्या डावात झाकिर हसन (Zakir Hasan) आणि नजमुल हुसेन शांतो (Najmul Hossain Shanto) यांनी अनुक्रमे 100 आणि 64 धावा कुटल्या. त्यांच्या खेळीच्या मदतीने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेशने 6 विकेट्स गमावत 272 धावा चोपल्या. भारताने तिसऱ्या दिवशी बांगलादेशला विजयासाठी 513 धावांचे आव्हान दिले होते. यावेळी बांगलादेशने शनिवारी सकाळी एकही विकेट न गमावता 42 धावांवर खेळण्यास सुरुवात केली. दिवसाचा खेळ संपेपर्यंत कर्णधार शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) 40 आणि मेहिदी हसन (Mehidy Hasan) 09 धावांवर खेळत आहे. यावेळी भारताकडून गोलंदाजी करताना कुलदीप यादव, आर अश्विन आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे. (bangladesh captain litton das edge the ball but indian players do not appeal)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयसीसीसोबतचा ‘हा’ वाद भारताला महागात पडणार! विश्वचषकाच्या यजमानपदासाठी मोजावे लागणार 900 कोटी
पॉंटिंगने केलेली भविष्यवाणी खरी ठरली, क्षेत्ररक्षणाची रचना पाहूनच सांगितली होती ‘ही’ गोष्ट